दि. २८/८/२३ रोजी होळ १२ फाटा गायकवाड वस्ती येथे भैरवनाथ मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम
प्रतिनिधी दादा जाधव
होळ ता. फलटण १२ फाटा गायकवाड वस्ती येथे उदया दि.२८ ऑगस्ट २०२३ रोजी भैरवनाथ मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम संपन्न होणार असून दि.२७ रोजी कलशाची सवाद्य भव्य नगर प्रदक्षिणा व सायंकाळी रुक्मिणी प्रासादिक महिला मंडळ पिंपळवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे
तसेच २८ रोजी सकाळी होमहवन व परम पूज्य वेदमूर्ती माधवानंद महाराज सोमेश्वर मंदिर यांच्या हस्ते कलशारोहण होणार आहे ह भ प रवींद्र टिळेकर महाराज यांचे कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
तरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Post a Comment
0 Comments