दि एम्रल्ड हाईट्स प्री स्कूल अँड अकॅडमी साखरवाडीमध्ये गोकुळाष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली.
फलटण/वैभव जगताप
फलटण तालुक्यातील दि एम्रल्ड हाईट्स प्री स्कूल अँड अकॅडमी साखरवाडीमध्ये गुरुवार दिनांक 07/09/2023 रोजी गोकुळाष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली दत्तात्रय शिंदे मॅडम उपस्थित होत्या. गोकुळाष्टमीनिमित्त मुले कृष्ण व मुली राधाच्या वेशभूषेत तयार होऊन आले होते . सर्वप्रथम प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतीमेचे पूजन करण्यात आले. शाळेमध्ये दहीहंडी बांधण्यात आली होती.
त्यानंतर शाळेच्या शिक्षिका वर्षा खोमणे मॅडमनी मुलांना गोकुळाष्टमी विषयी माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी एकावरती एक उभे राहून मनोरा तयार केला व दहीहंडी फोडली. त्यानंतर मुलांनी श्रीकृष्ण गीते वरती आपले नृत्य सादर केले. अशाप्रकारे गोकुळाष्टमी हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली दत्तात्रय शिंदे मॅडम, शाळेच्या इन्चार्ज शितल कुंभार, मोनाली कुलकर्णी, शिवगंगा पवार, वर्षा खोमणे, पल्लवी भापकर,शिरीन मुलाणी, मोनाली जाधव, अश्विनी गायकवाड , पल्लवी चौगुले. सुषमा गायकवाड सर्व विद्यार्थी वर्ग, शिक्षकवृंद उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments