स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई
फलटण/वैभव जगताप
शिरवळ पोलीस ठाण्याकडीले चोरीचा गुन्हा उघड करुन, एक मारुती स्विफ्ट कार (चालू बाजार
भावाप्रमाणे सुमारे ७,००,००० /- रुपये किंमतीची) हस्तगत.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक
सातारा यांनी सातारा जिल्हयामध्ये घडलेले वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सूचना श्री अरुण
देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे अरुण देवकर
पोलीस निरीक्षक यांनी रविंद्र भोरे सहायक पोलीस निरीक्षक यांच्या अधिपत्त्याखाली विशेष तपास
पथक तयार केलेले आहे.
दिनांक २९/१०/२०२३ रोजी शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा गांवचे हद्दीतील सैफी स्क्रॅप नांवचे
दुकानासमोर लावलेली लाल रंगाची स्विफ्ट कार क्रमांक एम. एच. ११ डीएच / ६२४२ ही कोणीतरी
अज्ञात चोरटयाने चोरुन नेले बाबत शिरवळ पोलीस ठाणे गुरनं ३०१ / २०२३ भादंवि कलम ३७९
प्रमाणे दाखल आहे.
दिनांक ०३/११/२०२३ रोजी श्री अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांना त्यांचे बातमीदारा मार्फत
बातमी मिळाली की, एक इसम वरील नमुद गुन्हयातील चोरीस गेलेली स्विफ्ट कार वर्ये ता. जि. सातारा
येथील विठ्ठल मंगलम कार्यालय येथे विक्री करीता घेवून येणार आहे अशी माहिती मिळाल्याने त्यांनी
सपोनि रविंद्र भोरे व त्यांच्या पथकास सदर ठिकाणी जावून नमुद इसमास पकडून कारवाई करण्याच्या
सूचना दिल्या. त्याप्रमाणे सपोनि रविंद्र भोरे यांनी विठ्ठल मंगलम कार्यालय वर्ये याठिकाणी जावून
सापळा लावून कौशल्याने बातमीतील इसमास चोरीस गेलेल्या कारसह पकडून त्याच्या ताब्यातून वरील
चोरीस गेलेली लाल रंगाची स्विफ्ट कार क्रमांक एम.एच.११ डीएच/६२४२ (चालू बाजार भावाप्रमाणे
सुमारे ७,००,०००/- रुपये किंमतीची) हस्तगत करुन शिरवळ पोलीस ठाणे गुरनं ३०१ / २०२३ भादंवि
कलम ३७९ हा गुन्हा उघड केलेला आहे.
सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर
पोलीस अधीक्षक सातारा, यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा
सातारा, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील,
विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय
कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, सचिन साळुंखे, प्रविण फडतरे, सनी आवटे,
अमित माने, गणेश कापरे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, स्वप्नील कुंभार, ओमकार यादव, विक्रम
पिसाळ, मोहन पवार, अरुण पाटील, विशाल पवार, प्रविण पवार, रोहित निकम, सचिन ससाणे,
पृथ्वीराज जाधव, मयूर देशमुख, संकेत निकम, शिवाजी गुरव, सायबर विभागाचे अमित झेंडे, अजय
जाधव, यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख,
पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले
आहे.
.jpg)
Post a Comment
0 Comments