सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
पाचगणी मध्ये वाहतुकीत दिनांक ५ व ६ तारखेच्या दरम्यान फेरबदल...!
महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३ (१) (ब) प्रमाणे अधिसूचना
ज्या अर्थी माझ्या असे निदर्शनास आले आहे की, पाचगणी पोलीस ठाणे हददीत पांचगणी शहर व पांचगणी गावचे
परिसरामध्ये पांचगणी एस. टी. स्टॅण्ड ते श्री. घाटजाई देवी मंदीर मेन रोड पांचगणी येथून दिनांक ०५/०३/२०२४ ते दि.
०६/०३/२०२४ या कालावधीत सकाळी १०.०० वा. पासुन सायंकाळी ०४.०० वा पर्यंत श्री. घाटजाई देवीची, ढोल, लेझीम यांचे
समावेशासह भव्य पालखी छबिना मिरवणुक कार्यक्रम होणार आहे. यामुळे वाई येथून महाबळेश्वर जाणारे वाहणांची पांचगणी
शहरात गर्दी होवून वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्या अर्थी, मी समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, मला प्राप्त झालेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३
(१) (ब) प्रमाणे अधिकारास अनुसरुन पांचगणी गावातील व परिसरातील रस्त्यावरील वाहतूकीत दि. ०५/०३/२०२४ ते दि.
०६/०३/२०२४ या कालावधीकरीता खालील प्रमाणे बदल जारी करीत आहे याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.
दिनांक ०५/०३/२०२४ रोजी ००.०० ते दिनांक ०६/०३/२०२४ रोजी २४.०० पर्यंत खालीलप्रमाणे वाहतूक
व्यवस्थेत तात्पुरता बदल करणेत आलेला आहे.
१.महाबळेश्वर बाजुकडुन वाई बाजुकडे जाणारी वाहतुक -
एस.टी. स्टॅण्ड चौक पांचगणी मार्गे राहिल प्लाझा - टेबल लॅण्ड कॉर्नर-अपना हॉटेल -भिमनगर जुने पोलीस ठाणे ते मेन
रोड.
२.वाई बाजुकडुन महाबळेश्वर बाजुकडे जाणारी वाहतुक -
डॉ. बाबसाहेब आंबेडकर उद्यान- चेसन रोड शॉलम हायस्कुल- न्युइरा हायस्कुल मार्गे रश्मी चौक मेन रोड.
३.अवजड वाहणासाठी वाहतुक मार्ग वेळ सकाळी ११.०० ते रात्रौ ००.०० वा. पर्यंत..
१. महाबळेश्वर वरुन वाई- पुणे बाजुकडे जाणारी अवजड वाहणाची वाहतुक संजीवन नाका मार्गे करहर कुडाळ-
पांचवड
२. महाबळेश्वरकडे जाणारी अवजड वाहणाची वाहतुक पाचवड मार्गे-कुडाळ-करहर संजीवन नाका- महाबळेश्वर.
वरील नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३१ अन्वये कारवाईस पात्र राहतील
याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments