Type Here to Get Search Results !

दारू वाहतूक करणाऱ्या बोलेरो गाडी सहित सात लाखाचा मुद्देमाल जप्त - कराड डी. बी. पथकाची कारवाई

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/ वैभव जगताप 

दारू वाहतूक करणाऱ्या बोलेरो गाडी सहित सात लाखाचा मुद्देमाल जप्त - कराड डी. बी. पथकाची कारवाई .


सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या काळात कराड शहर डी. बी. पथकाची बेकायदेशीर

दारु वाहतुकीवर मोठी कारवाई एक बोलेरो गाडीसह एकुण सात लाखाचा मुद्देमाल जप्त

मा. श्री. समीर शेख सो. पोलीस अधीक्षक सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल सो. सातारा, मा.

उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. यांनी कराड शहर पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस

निरीक्षक के.एन. पाटील सो यांना आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने लागु केलेल्या आचार संहिता

काळात कराड शहरातील सर्व बेकायदेशिर धंदयावर तसेच बेकायदेशिर हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन ठोस कारवाई

करण्याबाबत आदेशित केले होते. त्या नुसार वपोनि श्री के. एन. पाटील यांनी पोलीस उप निरीक्षक पंतग पाटील यांचे

मार्गदर्शनाखाली पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदिप कोळी, संग्राम पाटील

अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, यांची सदर कामगीरी साठी एक विशेष पथक म्हणुन रचना केली होती.

दिनांक 23/03/2024 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील सो. यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदार मार्फत

बातमी मिळाली की, मलकापुर बैलबाजार रोड वर गोकाक पेट्रोल पंपा जवळ एक संशयीत इसम एका पांढऱ्या रंगाचे

बोलेरो एम एच 11 एके 2897 या गाडीतुन बैकायदेशिर रित्या विदेशी दारुची वाहतुक करणार आहे. त्याबाबत वरिष्ठ

पोलीस निरीक्षक के. एन. पाटील सो यांनी तात्काळ पोलीस उप निरीक्षक पंतग पाटील, पोउनि डिसले व डीबी पथकास

त्यांबाबत माहिती देवुन कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार डी. बी. पथक मलकापुर बैल बाजार रोडवर गोकाक पेट्रोल

पंपा जवळ सापळा रचुन थांबले असता एक इसम संशयीत पांढऱ्या रंगाची बोलेरो एम एच 11 एके 2897 गाडी

मलकापुर कडुन कराड कडे घेवुन येताना दिसुन आला त्यास गाडी थांबवण्याचा इशारा करताच तो चकवा देवुन पळुन

जात असताना पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील, पोउनि डिसले व डी. बी पथकाने त्यास पाठलाग करुन ताब्या घेतले व

त्याचे ताब्यातील बोलेरो गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये एकुण 1,16,160/- किंमतीची विदेशी दारु मिळुन आली

असुन ताब्यात घेतले इसमाने त्याचे नाव ऋषिकेश दिलीप कणसे वय 26 वर्षे रा. शेणोली ता. कराड जि. सातारा

असल्याचे सांगितले. त्याबाबत कराड शहर पोलीस ठाणेस गुन्हा नोंद केला असुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील

सो.यांचे मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे. सदर कारवाईत एक बोलेरो गाडीसह एकुण सात लाखाचा मुद्देमाल

जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल सो.

-सातारा मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक

के.एन.पाटील सो.कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक पतंग

पाटील सो पोलीस उपनिरीक्षक कृष्णा डिसले सो, सफौ रघुवीर देसाई, सफौ संजय देवकुळे, पोलीस हवा. शशिकांत

काळे, अमित पवार, पोलीस नाईक, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पो.शि.संग्राम पाटील, अमोल देशमुख, मुकेश

मोरे, दिग्विजय सांडगे. महेश शिंदे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments