Type Here to Get Search Results !

सुरवडीतील खवळे वस्ती येथे महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन - उपसरपंच विजय खवळे

 सह्याद्री निर्भिड न्यूज

प्रतिनिधी/दादा जाधव 

सुरवडीतील खवळे वस्ती येथे महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन - उपसरपंच विजय खवळे .


 

       सुरवडी ता. फलटण येथील खवळे वस्ती येथे गेल्या ३५ वर्षापासून दरवर्षी कै.दादा पांडुरंग खवळे यांच्या कृपाशीर्वादाने मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या उत्सवात अध्यात्मिक भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सुरवडी गावचे उपसरपंच विजय खवळे व कुटुंबियाकडून यांनी केले आहे

      या कार्यक्रमानिमित्त शुक्रवार दि.०८ रोजी बाळासाहेब (बालकनाथ) झाडगे महाराज यांच्या उपस्थितीत शिवलीलामृत वाचन,पूजा शिव पूजा,शंख पूजा होणार  आहेत होणार असून महाराष्ट्राच्या विविध भागातून ७३ एकतारी भजनी मंडळ भाग घेणार आहेत

      या कार्यक्रमास कै.दादा पांडुरंग खवळे यांचे परममित्र    फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादरावजी साळुंखे पाटील उपस्थित राहणार आहेत

      तरी परिसरातील सुरवडी साखरवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी ९ सर्कल,१६फाटा खवळे वस्ती येथे कार्यक्रमास उपस्थित राहावे तसेच महाप्रसादाचे नियोजन शनिवार ०९ रोजी सकाळी ७ ते २ या वेळेत होईल असे कार्यक्रमाचे नियोजक व आयोजक विद्यमान सुरवडी गावचे उपसरपंच विजय खवळे यांच्या वतीने कळविण्यात येत आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121


Post a Comment

0 Comments