Type Here to Get Search Results !

पुसेगाव येथे डोक्यात दगड घालून निर्घुन खून केल्याचा गुन्हा १२ तासाचे आत उघड.

सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप

 पुसेगाव येथे डोक्यात दगड घालून निर्घुन खून केल्याचा गुन्हा १२ तासाचे आत उघड.


दि.२३/०४/२०२४ रोजी



२३.०० वा. ते दि. २४/०४/२०२४ रोजीचे सकाळी ०६.०० वा.चे. दरम्यान मौजे

खटाव ता. खटाव गावचे हद्दीत आंबेडकरनगर मधील फिर्यादी यांचे राहते घरासमोर मयत रोहित उर्फ विकास

उर्फ विकी शांताराम सावंत वय ३० वर्षे याचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन डोक्यात दगड

घालून त्याचा निर्घुन खुन केला म्हणून वगैरे दिले मजकुरचे फिर्यादीवरुन पुसेगाव पोलीस ठाणे

गु.र.नं.८६/२०२४ भादविक ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.

नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल

दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती सोनाली कदम उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव

उपविभाग कोरेगाव, पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सहायक पोलीस निरीक्षक

आशिष कांबळे यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट दिली. श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांनी

गुन्हयातील अज्ञात आरोपी बाबत माहिती काढून त्यास ताब्यात घेण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण

देवकर व पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांना दिल्या. त्याप्रमाणे

पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व

पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली तपास पथक तयार करुन त्यांना नमुद गुन्हयातील

अज्ञात आरोपीस ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या.

स्थानिक गुन्हे शाखा सातारा व पुसेगाव पोलीस ठाणेकडील तपास पथकांनी सर्वप्रथम

घटनास्थळाची पाहणी केली, घटनास्थळावरील आजूबाजूचे परिसरातील साक्षीदार यांचेकडे गुन्हयाचे

अनुशंगाने सखोल विचारपूस केली असता तपास पथकास मयत याचे एका महिलेशी अनैतिक संबंध

असल्याची माहिती प्राप्त झाली. तसेच त्या महिलेचे आंबेडकर नगर खटाव येथील आणखी एका व्यक्तीशी

अनैतिक संबंध असल्याचे देखील समजल्याने तपास पथकांनी संशईत व्यक्तीस ताब्यात घेवून त्याचेकडे

कौशल्यपुर्वक Interrogation Skill चा वापर करुन विचारपुस केली असता त्याने नमुद महिलेशी मयत

याचे अनैतिक संबंध असल्याचा राग मनात धरुन मयत रोहित उर्फ विकास उर्फ विकी शांताराम सावंत हा

झोपला असताना त्याचे डोक्यात दगड घालून त्याचा खुन केला असल्याचे सांगीतल्याने १२ तासाचे आत

निर्घुन खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

श्री.समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा व

श्रीमती सोनाली कदम उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस

निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे पुसेगाव पोलीस ठाणे, सहायक पोलीस

निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, तानाजी माने, पुसेगाव पोलीस ठाण्याचे

पोलीस उपनिरीक्षक सुधीर येवले, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, मंगेश महाडीक, सचिन साळूंखे, सनी

आवटे, मनोज जाधव, प्रविण कांबळे, अमित माने, राजू कांबळे, केतन शिंदे, वैभव सावंत, शिवाजी गुरव

पुसेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सुधाकर भोसले, चंद्रहार खाडे, सुभाष शिंदे, धनंजय शिंदे,

योगेश बागल, गितांजली काटकर, सुनिल अबदागिरे, अशोक सरक, प्रमोद कदम, शंकर सुतार, अमोल

जगदाळे, अविनाश घाडगे, अश्विनी नलवडे, कविता बरकडे, यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत

सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल

अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

https://chat.whatsapp.com/EAcU5UeglYl6sOte0VCfZL

Post a Comment

0 Comments