सह्याद्री निर्भिड न्यूज
प्रतिनिधी/तानाजी सोडमिसे
स्वयंभू दक्षिण मुखी मारुती देवस्थान ट्रस्ट सोमंथळी जन्मोत्सव.
सोमंथळी ता. फलटण येथील दक्षिण मुखी स्वयंभू श्री मारुती मंदिर हे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या मारुतीला नवश्या मारुती म्हणून ही संबोधले जाते. आज ता. २३ हनुमान जन्मोत्सवा निमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दैनंदिन कार्यक्रम अखंड विना पहाटे ४ ते ६ काकडा सकाळी ८ ते ११ व दु. ३ ते ५ ज्ञानेश्वरी वाचन सायं. ५ ते ६ प्रवचन संध्याकाळ ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११कीर्तन रात्री अकरा वाजता हरिजागर अखंड हरिनाम सप्ताह मध्ये अनेक संत महात्मे यांचे प्रवचन कीर्तन त्याचबरोबर उत्सव साजरा होत आहे.
सातारा जिल्ह्याचा पूर्व,- उत्तर भाग( फलटण माण) पूर्वी दंडकारण्यात मोडत होता. रावणाची सत्ता मोडीत काढून विजय मिळवल्यानंतर प्रभू रामचंद्र अयोध्येत परतले. अयोध्येतील जनतेने सीतेच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्या मुळे दुःखी होऊन प्रभू रामाचंद्राने सीतेचा त्याग केला.
प्रभूरामाने त्याग केल्यानंतर सीता मातेने फलटण- माण (पूर्वीचे दंडकारण्य) वास्तव्य केल्याची अख्यायिका सांगितली जाते.
त्यानुसार या परिसरात सीतामातेने एका पर्णकुटीत वास्तव्य केले याच ठिकाणी सीतामातेने लव व कुश यांना जन्म दिला. कालांतराने रामाने अश्वमेघ यज्ञ केला व जग जिंकण्यासाठी घोडा सोडला होता. तो घोडा फलटण पूर्व भागात लव व कुश या दोघांनी अडविला होता त्या घोड्याला सोडविण्यासाठी रामाने भरत, शत्रुघन, लक्ष्मण यांना पाठविले परंतु तेही या बालकांसमोर पराभूत झाले. ही वार्ता रामाला समजताच रामाने हनुमंतास बोलवले त्या ठिकाणी हनुमान आल्यानंतर सैनिकांनी घोडा सोडविण्यासाठी सांगितले हेकेखोर लव-कुश ने घोडा सोडविण्यास नकार दाखविला व हनुमानास युद्धाची चिथावणी दिली. हनुमंताने युद्धाची तयारी केली व गदारोपी अस्त्र उचलले असता ती दोन बालके रामरुपी दिसू लागली त्यावेळी हनुमंताने त्यांच्या समोर नतमस्तक होऊन हात जोडले. त्यावेळी लव-कुश यांनी हनुमंतास सोमंथळी येथील सोमरस या लिंबाच्या झाडाला बांधले त्या ठिकाणी स्वयंभू हनुमंताची दक्षिणमुखी मूर्ती प्रकट झाली.
सोमंथळी येथील महिला शेणाच्या गोवर्या गोळा करीत असताना एका शेणाच्या गोवरी खाली त्यांना एक लाल रंगाचा कोंब दिसून आला. गावकऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता त्यांच्या लक्षात आले की त्या ठिकाणी साक्षात हनुमान प्रकट झाले आहेत. कालांतराने त्या ठिकाणी मंदिर बांधण्यात आले त्या मंदिराचा पाया १८ फूट खोल नेण्यात आला होता सोमरस या लिंबाच्या झाडावरून ब्रिटिश काळात सोमंथळी हे नाव उदयास आले सोमंथळी येथील दक्षिणमुखी मारुती मंदिर फलटण येथील राम मंदिर व सीतामाईच्या डोंगरावरील मंदिर हे एका सरळ रेषेत येतात हे खास वैशिष्ट्य आहे.
सोमंथळी येथील हे दक्षिणमुखी स्वयंभू श्री हनुमान मंदिर जागृती देवस्थान म्हणून ओळखले जाते. या हनुमानाच्या दर्शनासाठी मुंबई, पुणे, सोलापूर, माळशिरस, पंढरपूर, बारामती, माण, खटाव व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात २०१० पासून प्रत्येक शनिवारी प्रवचन व कीर्तनाचे आयोजन करण्यात येते ग्रामस्थांमार्फत फराळांचे वाटपही करण्यात येते दर पौर्णिमेला श्रींच्या पालखी प्रदक्षिणाचा कार्यक्रम व महाप्रसादाचे नियोजन केले जाते यात्रेच्या अगोदर सात दिवस सप्ताह असतो या दक्षिणमुखी मारुती चा जन्मपौर्णिमेला झाला असल्याने दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा चालत आली आहे. ती ग्रामस्थांनी तसेच परंपरागत चालू ठेवली आहे आज ता.२३/४/२०२४ रोजी पहाटे चार ते सहा हनुमान जन्म काळ निमित्त स्थानिक भजनी मंडळांचा संगीत भजन सोहळा सहा वाजून दहा मिनिटांनी गुलाल पुष्पांची उधळण करीत हनुमान जन्मोत्सव कार्यक्रम संपन्न होईल सकाळी ८ ते ९ यावेळी गाव प्रदक्षिणा दिंडी मिरवणूक होईल सकाळी ९ ते ११ या वेळेमध्ये ह.भ.प. पांडुरंग महाराज सोडमिसे सोमंथळी यांचे काल्याचे किर्तन होईल. दुपारी तीन ते सहा कावडी काट्यांची मिरवणूक रात्री ९ते११ श्रींच्या छबिना मिरवणूक होणार आहे. तसेच त्यानंतर करमणूक कार्यक्रम.
शुक्रवारी ता. २४ सकाळी १० ते ३ पर्यंत लोकनाट्य तमाशा कार्यक्रम दुपारी ४ ते ८ या वेळेत जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे या हनुमान जन्मोत्सवाचा लाभ फलटण तालुका व सो मंथळी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घ्यावा असे आव्हान मारुती देवस्थान ट्रस्ट सोमंथळीचे अध्यक्ष संजय भगवान सोडमिसे व विश्वस्त कमिटी कडून करण्यात येत आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121


Post a Comment
0 Comments