Type Here to Get Search Results !

जिलेटीन कांडया, डिले डिटोनेअर, व इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर अशा घातक स्फोटकांचा बेकायदा साठा जप्त .

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/ वैभव जगताप 

जिलेटीन कांडया, डिले डिटोनेअर, व इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर अशा घातक स्फोटकांचा बेकायदा साठा जप्त.


स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची मोठी कारवाई

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांनी लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने आचारसंहिता

कालावधीत बेकायदेशीर स्फोटक पदार्थाबाबत माहिती काढून प्रभावी कारवाई करणेच्या सुचना पोलीस निरीक्षक

श्री. अरूण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी

सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या अधिपत्त्याखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार केले होते.

दिनांक ०१ मे २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरूण देवकर यांना त्यांचे

बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, बोरगांव पोलीस ठाणे हद्दीत बोरगांव ते आनंद कृषी पर्यटन केंद्र या रस्त्याने एक

इसम स्कॉर्पिओ वाहनातून बेकायदेशीर जिलेटीन स्फोटकांची वाहतुक करणार आहे अशी बातमी प्राप्त झाली होती.

त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. अरूण देवकर यांनी स.पो.नि. सुधीर पाटील यांचे पथकास सदर ठिकाणी जावून खात्री

करून कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, त्यांचे सोबत बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथकातील श्वान

आझाद व सुर्या व बोरगांव पोलीस ठाणे यांचे पथक यांनी मिळाले बातमीचे ठिकाणी बोरगांव ते आनंद कृषी पर्यटन केंद्र

या रस्त्याला सापळा लावला. सायंकाळच्या सुमारास मिळाले बातमी प्रमाणे पथकास एक पांढरे रंगाचे स्कॉर्पिओ वाहन

येताना दिसले सदर पथकाने स्कॉर्पिओ वाहनास थांबवून त्याची पाहणी असता सदर वाहनामध्ये खाकी ५ बॉक्स व पोती

दिसून आली व त्याची बाँम्ब शोधक व श्वान पथकामार्फत तपासणी केली असता त्यामध्ये जिलेटीन च्या १०७० कांडया,

डिले डेटोनेटर ५९ नग व इलेक्ट्रॉनिक डेटोनेटर १७ असे स्फोटकांचे साहित्य मिळून आले आहे. वाहनातील इसमास

स्फोटक पदार्थ व डिटोनेटर कब्जात बाळगण्याचा अगर वाहतुक करण्याचा परवाना आहे अगर कसे याबाबत विचारणा

केली असता त्याने माझेकडे कोणताही परवाना नसल्याचे व सदरची स्फोटके विक्री करण्याकरीता घेवून जात असल्याचे

सांगीतले. यावरून सदरचा इसम हा बेकायदेशीरपणे घातक स्फोटक पदार्थांची विक्री करण्याकरीता वाहतुक करीत

असलेची खात्री झाली त्याचे कब्जातून जिलेटीनच्या १०७० कांडया, डिडेटोनेटर ५९ नग, इलेक्ट्रॉक डेटोनेटर १७ नग

असे स्फोटक पदार्थ व स्कॉर्पिओ वाहन असा एकुण ६ लाख १७ हजार ९५० रू. चा माल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई मध्ये श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक

सातारा, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि.

सुधीर पाटील, सहा.पोलीस उपनिरीक्षक सुधीर बनकर, पो.हवा. सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, हसन

तडवी, सनि आवटे, मुनिर मुल्ला, अमित झेंडे, मनोज जाधव, राजू कांबळे, धिरज महाडीक, मोहसीन मोमीन, केतन

शिंदे, सचिन ससाणे, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे पोउनि शशिकांत घाडगे, पो. अंमलदार, महेश पवार, निलेश दयाळ,

अतुल जाधव, विजय सावंत, अनिकेत अहिवळे, श्वान आझाद व सुर्या तसेच बोरगांव पोलीस ठाणे कडील स.पो.नि.

रविंद्र तेलतुंबडे., म.पोउनि श्रीमती स्मिता पाटील, पो. अंमलदार प्रशांत चव्हाण, केतन जाधव यांनी सहभाग घेतला. अशा

प्रकारे लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत केलेल्या उत्कृष्ट कारवाईबाबत सहभागी अधिकारी व अंमलदार

यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री. अतुल

सबनीस, पोलीस उप अधीक्षक, सातारा यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments