Type Here to Get Search Results !

फलटण जिंती नाका येथे अपघातात 19 वर्षीय युवक जागीच ठार

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

सोमंथळी/तानाजी सोडमीसे 

फलटण जिंती नाका येथे अपघातात 19 वर्षीय युवक जागीच ठार.



दि.२६/६/२०२४ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास लोणंद- फलटण महामार्गावरील फलटण येथील महादेव मंदिर, जिंती नाका येथे अभिजीत महादेव करचे वय 19 वर्षे रा. पिंपरी ता. माळशिरस जि. सोलापूर व कृष्णा रमेश सूळ वय 19 वर्षे रा. मोरोची ता. माळशिरस जि .सोलापूर हे दोन्ही युवक पुण्याहून पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करून परत येत असताना फलटण जिंती नाका येथे ट्रकच्या डाव्या बाजूने ओव्हरटेक करत असताना मोटरसायकल घसरून अभिजीत करचे हा ट्रकच्या खाली आल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अशी फिर्याद त्याच्याबरोबर असणारा युवक कृष्णा रमेश सुळ याने फलटण शहर पोलीस स्टेशनला दिलेली असून याचा अधिक तपास फलटण शहर चे पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे हे करीत आहेत. 

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments