सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
विडणी करांनी घडविले माणुसकीचे दर्शन-पोलीस पाटलांच्या सतर्कतेने चुकलेला वारकरी सुखरूप आपल्या घरी परतला.
दि 11 जुलै रोजी माऊली ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गांवर विडणी गावामध्ये माऊलीची पालखी लाखो वारकऱ्यांसाह पंढरपूर कडे गेली.या पालखी बरोबर अनेक दिंड्या जातात या मधील हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कहाकर गावातील दिंडीमधील एक वारकरी नारायण लक्ष्मण पोपळघट हे चुकले.त्यांना फिट येत असल्याने व अगोदरच आजारी असल्याने आपल्या दिंडीमध्ये न जाता विडणी मध्येच राहिले. पालखी पुढे गेली व ते विडणी मधील अमोल रघुनाथ नाळे यांच्या घरी राहिले माणुसकी सारखा श्रेष्ट दुसरा धर्म नाही या प्रमाणे नाळे कुटुंबियांनी त्याची जेवण व राहणयची सोय केली त्यांना बोलता येत नव्हते अंगात ताप चढला होता फीट आल्या ने दुसऱ्या दिवशी त्यांनी विडणीच्या पोलीस पाटील सौ. शीतल धनाजी नेरकर यांना फोनवरुन कळविले. पोलीस पाटलांनी 108 रुग्णवाहिकेला फोन करून सदरील वारकऱ्याला फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठविले तिथे त्यांना पुढील उपचारासाठी बारामती मेडिकल कॉलेज येथे हलविण्यात आले.
दिंडी चालकांनी फलटण शहर पोलीस स्टेशनला बेपत्ता असलेची तक्रार दिली व जागो-जागी पोस्टर लावले. परंतु त्यांचा काही पत्ता लागला नाही. विडणीच्या पोलीस पाटील सौ.नेरकर यांनी वारकऱ्याची माहिती फोटो सह महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्या ग्रुपवर पाठवली. राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील , सातारा जिल्हा अध्यक्ष प्रदीप गाढवे पाटील यांनी सदरील मॅसेज राज्यभर पोहचवीला.व तद्नंतर काल दि.19 जुलै रोजी हिंगोली मधील त्या कुटुंबिया पर्यंत मॅसेज पोहचला. त्यांनी विडणी च्या पोलीस पाटलांशी संपर्क साधला असता नारायण पोपळघट सध्या बारामती येथील रुग्णालयात उपचार घेत असलेचे सांगितले व त्या कुटुंबाची आणि वारकऱ्याची अखेर भेट झाली. अजूनही त्याची प्रकृती व्यवस्थित नाही. मानसिक संतुलन ठीक नसल्याने ते आपल्या गावात उपचार घेत आहेत.
या एकूणच घटनेमध्ये सोशल मीडिया चा आपण कशा प्रकारे उपयोग करू शकतो याचे हे एक उत्तम उदाहरण आणि पोलीस पाटलांनी दाखवलेली कार्यतत्परता यामुळे हरविलेली व्यक्ती मिळाली . विडणी मधील अमोल नाळे , पोलीस पाटील शीतल नेरकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हिंगोली जिल्ह्यातून अनेक मंडळी त्यांची व्यक्ती भेटल्याने फोन द्वारे धन्यवाद देत आहेत.

Post a Comment
0 Comments