सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
फलटण शहरातील मुधोजी हायस्कूल येथे निर्भया पथकाने मोटार वाहन कायद्यांतर्गत केल्या 28 केसेस.
आज सकाळी ०९.०० वाजता ते ११.३० वाजता मुधोजी हायस्कूल, फलटण शहर येथे फलटण शहर पोलीस ठाणे आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल धस यांचे कडील निर्भया पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत मोटर वाहन कायद्यांतर्गत 28 केसेस मधे रू.19,400/- दंड आकारण्यात आला आहे आणि १९ विद्यार्थ्यांचे समुपदेशन आणि १३ व्यक्तीवर कलम ११०/११७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कारवाई केली आहे.
या कारवाईत फलटण शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, पो.शि.पांडुरंग धायगुडे, ऋषिकेश खरात, मारुती लोलापोड, संभाजी जगताप सुरज परिहार आणि निर्भया पथकतील महिला पोलीस हवालदार वैभवी भोसले, पोलीस नाईक फैयाज शेख, पो.शि. दत्तात्रय भिसे, संध्या वलेकर यांनी सहभाग घेतला.

Post a Comment
0 Comments