सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून दोन चोरीचे गुन्हे उघड करुन त्याचेकडुन रक्कम रुपये १,७०,०००/- किमतीचे अडीच तोळे सोने हस्तगत
शाहुपूरी पोलीस ठाणे मध्ये दि. २५/०६/२०२४ रोजी चोरीची तक्रारàaà प्राप्त झालेली होती. त्याप्रमाणे
शाहुपूरी पोलीस ठाणे गु.र.नं. २९२ / २०२४ भादवि कलम ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. चोरीच्या
गुन्ह्यामध्ये वाढ झालेने मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल,
मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले यांनी पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सावंत्रे यांना सदरचा गुन्हा
उघडकीस आणणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सावंत्रे यांनी गुन्हे प्रकटीकरण
शाखेचे पोलीस अधिकारी श्री. कुमार ढेरे व पोलीस अंमलदार यांना चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेवुन तात्काळ
अटक करणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या.
वरील गुन्हयाच्या अनुशंगाने गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अधिकारी व पोलीस अंमलदार संशयित इसमाचा
शोध घेत असताना दि. १४/०८/२०२४ रोजी तांत्रिक व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील
संशयीत इसम लोणंद व निरा येथील परिसरात असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे
पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर परिसरात जावुन संशयीत इसमांचा शोध घेवून त्या ठिकाणी
सापळा रचून संशयित इसमास ताब्यात घेतले त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा
केल्याची कबुली देवून माझे सोबत गुन्हा करतेवेळी माझा चुलता हा माझे सोबत होता व तो किर्लोस्करवाडी पलूस
जि. सांगली येथे राहणेस आहे असे सांगितलेने लागलीच गुन्हे प्रकटीकरन शाखेने तात्काळ सदर दुस-या संशयित
इसमाचा शोध घेवून त्यास किर्लोस्करवाडी ता. पलूस जि. सांगली या ठिकाणावरुन सापळा रचून ताब्यात घेवून गुन्हया
बाबत विचारणा केली असता त्यानेही गुन्हयाची कबुली दिली. तसेच शाहुपूरी पोलीस ठाणे येथील गुन्हयाची कबुली
देत असताना त्याने सातारा शहर पोलीस ठाणे गु.र.नं. १४७/२०१५ भा.द.वि. कलम ३८०, ३४ या गुन्हयातही तो गेले ०९
वर्षापासुन पाहीजे होता. त्या अनुषंगाने त्याचेकडे विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने सदरच्या गुन्हयाचीही
कबुली दिली. अशाप्रकारे शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने शाहुपूरी पोलीस ठाणे गुरनं. २९२ / २०२४ भादवि कलम
३८०,३४ तसेच सातारा शहर पोलीस ठाणे गु.र.नं. १४७/२०१५ भा.द.वि. कलम ३८०, ३४ हे दोन गुन्हे उघडकीस
आणले आहेत.
अशाप्रकारे शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने चोरी करणाऱ्या आरोपीस गोपनिय व तांत्रिक माहितीचे आधारे
ताब्यात घेवुन त्याचेकडुन अडीच तोळे सोने असा एकुण १,७०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन चोरीचे
गुन्हे उघकीस आणले आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल,
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सावंत्रे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे
प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी श्री. कुमार ढेरे व पोलीस अंमलदार सुरेश घोडके, निलेश काटकर, महेश
बनकर, अभय साबळे, सचिन पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, तनुजा शेख यांनी केली
असून सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस हवालदार विजय भिंगारदेवे हे करीत आहेत.

Post a Comment
0 Comments