सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीने दोन जणांना उडवले.
दहिवडी नजीक शेरेवाडी फाटा येथील घटना रुग्णालयात उपचाराधीच दोघांचाही मृत्यू.माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील स्कार्पिओ गाडीने दहिवडी नजीक शेरेवाडी फाटा येथे दोन तरुणांना उडवल्याची घटना आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रणजीत राजेंद्र मगर वय 30 वर्ष व अनिकेत नितीन मगर अंदाजे वय 25 वर्ष हे दोघेजण शेरेवाडी फाटा येथुन बिदालच्या दिशेने स्कुटी क्रमांक MH11 Dk 8455 वरून जात असताना त्यावेळेस आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वेगाने आलेली काळया कलरची स्कार्पिओ गाडी क्रमांक MH11 DN 0100 ह्या गाडीने अनिकेत व रणजीत या दोघांना चिरडून गाडी 50 मिटर अंतरावर वर गेली. तात्काळ उपचारासाठी या दोघांना रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी या दोघांना मृत घोषित केले.


Post a Comment
0 Comments