सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
मा.श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी घेतला सातारा जिल्हा पोलीस दलाचे कामकाजाचा आढावा.
महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या संवेदनशील गुन्हे घडत आहेत. राज्यात घडत असलेल्या जातीय, धार्मिक
घडामोडी तसेच आगामी काळात असलेले सण, उत्सव या अनुशंगाने मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस
महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी सातारा जिल्हयाची आढावा बैठक आज दिनांक २८/०८/२०२४
रोजी घेतली आहे. नमुद बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यात सध्या घडत असलेले बदलापूर घटनेच्या पार्श्वभुमीवर तसेच
महिलांविषयीचे विविध गुन्हे तसेच जातीय, धार्मिक तणावाच्या घडामोडी अनुशंगाने घ्यावयाची दक्षता व
करावयाच्या विविध उपाययोजना याबाबत सातारा जिल्हा पोलीस दलाचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये
प्रामुख्याने मुली व महिला यांचे बाबतीत घडणाऱ्या गुन्हयाबाबत तात्काळ प्रतिसाद देवून गुन्हा दाखल करावा,
गुन्हयातील आरोपींना तात्काळ अटक करावी, अटक केलेल्या आरोपींचेवर कडक प्रतिबंधक कारवाई करावी,
दामिणी / निर्भया पथकाने सतर्क राहून गस्तीदरम्यान महिलाविषयक गुन्हयांना प्रतिबंध करणे, शाळा कॉलेजमध्ये
जावून मुले / मुली यांना मार्गदर्शन करणे, आक्षेपार्ह किंवा अनुचित घडणाऱ्या घटनेवर तात्काळ कायदेशीर कारवाई
करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.
आगामी काळात येणारे गणेशोत्सव, ईद व इतर धार्मिक सण व उत्सवांच्या बाबतीत कोणतेही दुर्लक्ष न
करता योग्य ती दक्षता घेवून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत सुचना दिल्या. पुर्वी दाखल
असलेल्या आरोपींवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करुन त्यांचे हलचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सुचना
दिल्या. आगामी येणाऱ्या सणांच्या पार्श्वभुमीवर गावभेटी देणे, शांतता कमिटीच्या बैठका घेणे, गणेश मंडळाच्या
बैठका घेणे, चांगले काम करणाऱ्या गणेश मंडळींना प्रोत्साहनपर बक्षिस देणे, इतर शासकिय खात्यांसोबत समन्वय
ठेवून त्यांचेशी पत्रव्यवहार करुन पाठपूरावा करणे, उपद्रवी लोकांचे हलचालींवर लक्ष ठेवणे, सोशल मिडीया
मॉनिटरींग करुन अनुचित संदेश व पोस्ट करणारे लोकांवर कायदेशीर कारवाई करणे, दंगा काबू योजना राबविणे,
संवेदनशील ठिकाणी रुट मार्च आयोजित करुन कोणत्याही प्रकारे जातीय, धार्मिक तणाव वाढणार नाही याची
दक्षता घेण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.
सातारा जिल्हयात घडत असलेल्या गुन्हयांच्या अनुशंगाने माहिती घेतली. फायर आर्म (अग्नीशस्त्र) बाबतीत
विशेष पथक तयार करुन सक्रिय असणाऱ्या टोळयांना व इसमांना शोधून ठोस कायदेशीर कारवाई करणेबाबत
सुचना दिल्या.
पोलीस ठाणे हद्दीत नविन अद्यावत करण्यात आलेली बिट मार्शल पेट्रालिंग व्यवस्था, रात्रगस्तीमध्ये केलेले
बदल, सराफ कट्टा, बझार अशा गर्दीच्या ठिकाणी चालू केलेली पायी पेट्रोलिंग तसेच वरिष्ठांच्या आदेशाने
वेळोवेळी राबविण्यात आलेली कोंबींग ऑपरेशन अशा विविध उपायांमुळे जुलै २०२३ अखेरच्या तुलनेत जुलै २०२४
अखेर गुन्हयांचे प्रमाण कमी करण्यास सातारा पोलीसांना यश मिळाले असलेबाबत माहिती घेवून समाधान व्यक्त
केले.
यापुढे भविष्यात देखील घडणाऱ्या गुन्हयास प्रतिबंध करणेकरीता पोलीस ठाणे हद्दीत बीट मार्शल पेट्रोलिंग,
पायी गस्त, प्रभावी रात्रगस्त, वेळोवेळी कोंबींग ऑपरेशन राबविणे, दृश्य पोलीसींग करणे, प्रत्येक गावात भेटी देवून
लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे, घडलेल्या गुन्हयांचा तात्काळ तपास करुन आरोपींचा शोध घेणे याबाबत सुचना
देवून मार्गदर्शन केले.
पोलीस अभिलेखावरील आरोपी शेख सुरेश भोसले रा. खामगाव ता. फलटण जि.सातारा याचेकडून दरोडा,
जबरी चोरी, घरफोडीचे २६ गुन्हे उघड करुन ३९,०९,०००/- रुपये किमतीचे ५४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे
हस्तगत करणारे स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बक्षिस व प्रशंसा पत्र देवून
गौरविले आहे. तसेच नमुद २६ गुन्हयातील फिर्यादी यांना मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक
कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांचेकडून मुद्देमाल ( सोन्याचे दागिणे ) परत करण्यात आलेले आहेत.
त्याचप्रमाणे सातारा तालूका पोलीस ठाणे गु.र.नं. ३११/२०१९ भादविक ३०२ या गुन्हयातील आरोपी जन्मठेप
व ५०००/-रुपये दंड अशी शिक्षा झाल्याने नमुद गुन्हयाचे तपासी अधिकारी व अंमलदार यांना बक्षिस व प्रशंसा
पत्र देवून गौरविले आहे.
मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी आयोजित केले
बैठकीस श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व सातारा जिल्हा पोलीस दलातील सर्व शाखांचे प्रभारी
अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments