Type Here to Get Search Results !

फलटण तालुक्यातील बोडकेवाडीतील शेतकऱ्याला डाळिंबाला मिळाला महाराष्ट्रात विक्रमी दर.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

प्रतिनिधी/तानाजी सोडमीसे 

फलटण तालुक्यातील बोडकेवाडीतील शेतकऱ्याला डाळिंबाला मिळाला महाराष्ट्रात विक्रमी दर.


माळरानावरील डाळिंबाने खाल्ला भाव;  मालाला मिळाला महाराष्ट्रात विक्रमी दर, फलटण तालुक्यातील बोडकेवाडीतील शेतकऱ्याची किमया

 जिथे लाथ मारीन, तेथे पाणी काढेल असे ध्येयधोरण ठरवून प्रयत्नाची पराकाष्टा केल्यास एखाद्या उजाड माळरानावर सुद्धा काळी आणि कसदार जमिनीपेक्षा जास्त उत्पन्नाची शेती केली जाऊ शकते. हे फलटण तालुक्यातील बोडकेवाडी येथील एका शेतकऱ्याने दाखवून दिले. त्याने त्या ठिकाणी डाळिंबाची बाग फुलवली आणि त्यातून लाखो रुपयांची कमाई केली आहे. येथील डाळिंबाला जागेवर 224 रुपयांचा भाव मिळाला असून तो सध्या राज्यात विक्रमी असल्याचे सिद्ध झाले आहे. या माध्यमातून या शेतकऱ्याने सर्वांसमोर उत्तम शेतीचा आदर्श वस्तूपाठ ठेवला आहे.

भारत हा शेतीप्रधान कृषीप्रधान देश आहे. शेतीवरच आपली अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्याला आपले राज्य अपवाद नाही. परंतु अनेकदा दुष्काळ, अवेळी पडणारा पाऊस त्याचबरोबर शेतीमालाला हमीभाव नसल्याने हा व्यवसाय तोट्यात जातो. भांडवल सुद्धा परत मिळत नाही. या कारणाने मराठवाडा विदर्भातील काही ठिकाणी शेतकरी आत्महत्या करत असल्याच्या घटना घडतात. शेती व्यवसाय फायद्यात नसल्याची ओरड कानावर पडते. त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. परंतु आधुनिक शेती केल्यास त्याचबरोबर त्याला शास्त्रोयुक्त पद्धतीची जोड दिल्यास नक्कीच चांगले उत्पन्न मिळून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होत असल्याचे अनेक ठिकाणी सिद्ध झाले आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात बोडकेवाडी हे गाव आहे. अतिशय कमी लोकवस्तीच्या या गावात पूर्वी प्रचंड मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता. पावसाचे प्रमाणही कमी आणि सिंचनाच्या सुविधा नव्हत्या, शेतीचा पोत सुद्धा सुपीक नव्हता. परंतु मध्यंतरी कर्म धर्म संयोगाने या परिसरातून कॅनॉल गेला. त्यामुळे सिंचनाची सोय या गावाला झाली. पाटाचे पाणी आल्याने बळीराजा काही प्रमाणामध्ये सुखावला. तरीसुद्धा काळी सुपीक जमीन नसल्याने तसेच माळरान असल्याकारणाने तुलनेत उत्पन्न कमी मिळत होते. सुशिक्षित युवा शेतकरी हनुमंत धनाजी सस्ते यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे ठरवले. त्यांनी सर्व अभ्यास करून तसेच माहिती घेऊन दोन एकरावर भगवा या प्रजातीच्या डाळिंबाची लागवड केली. त्याची उत्तम निगा राखली त्याचबरोबर कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त आणि तेही दर्जेदार उत्पन्न मिळेल या दृष्टिकोनातून शेती तज्ञांचे मार्गदर्शन घेतले. चांगल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करत उजाड मारानावर जिद्द चिकाटी आणि धाडस करून डाळिंबाची बाग फुलवली. गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्टिकोनातून पीक घेतले. विशेष म्हणजे हनुमंत सस्ते यांच्या बागेत आलेल्या डाळिंबाची चर्चा सर्वत्र झाली. अतिशय मोहक आणि दर्जेदार फळ त्यांच्या बागेला लागले. त्यानुसार पर राज्यातून व्यापारी त्या ठिकाणी आले. वेगवेगळ्या भावाने त्यांनी जागेवर डाळिंब मागितले.230 रुपये प्रति किलो दराने आपल्या मनाची विक्री करण्यावर ते ठाम होते. शेवटी बेंगलोर येथील व्यापाऱ्याने सस्ते यांच्या डाळिंबाला 224 रुपये इतका भाव दिला. आणि राज्यात तो खऱ्या अर्थाने विक्रमी ठरला. एकूण सहाशे झाडांना 15 टन इतका टन इतका माल निघाला. सस्ते यांनी केलेला प्रयोग आणि फुलवलेली डाळिंबाची बाग त्याचबरोबर त्यांच्या मालाला मिळालेला उच्चांक भाव याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे. त्यांनी या माध्यमातून फलटण, सातारा जिल्हा आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांसमोर फायदेशीर शेतीचा वस्तूपाठ ठेवला आहे.

दोन एकरात 33 लाख 60 हजारांचे उत्पन्न!

अनेकदा शेतीत भांडवलाचा खर्च निघत नाही. शेतकऱ्यांना तोट्यात हा व्यवसाय करावा लागतो. त्यातून कर्जबाजारीपणा वाढतो. परंतु बोडकेवाडी येथील हनुमंत सस्ते यांनी दोन एकरात 33 लाख 60 हजार रुपयांचे डाळिंबाचे उत्पन्न घेतले. त्यासाठी त्यांना चार लाख रुपये खर्च आला असला तरी त्यातून कितीतरी पटीने त्यांनी फायदा झाला आहे. त्यांची शेती पाहण्यासाठी आता सातारा जिल्ह्यातून लोक बोडकेवाडी या ठिकाणी येऊ लागले आहेत.

बोडकेवाडीचे डाळिंब सातासमुद्र पार!

बोडकेवाडी येथील सस्ते कुटुंबीयांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे. कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न काढत त्यांनी हरितक्रांतीचा एक प्रकारे पायंडा पडला आहे. बेंगलोर येथील व्यापाऱ्यांनी ही बाग जागेवर खरेदी केली.

Post a Comment

0 Comments