सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
फलटण येथील गोविंद दुध डेअरी येथुन चोरीस गेलेल्या तीन मोटरसायकल व आरोपी फलटण शहर पोलीसांच्या ताब्यात.
फलटण शहर पोलीस ठाण्यात चोरीस गेलेल्या मोटरसायकलच्या तक्रारी दाखल होत्या त्यामध्ये सीबी शाईन MH11 CL 0269 व सीबी युनिकॉर्न नं MH 11 BU 5991 आणि HF डीलक्स नं MH11 BT 8067 या सर्व मोटरसायकली गोविंद दूध डेरी पंढरपूर रोड फलटण येथून चोरीस गेलेल्या होत्या.
सदर मोटर सायकल माळशिरस पोलीस ठाणे कडील गु.नों.क्र. 148/२४, कलम ३७९ भा.दं.सं., दिनांक 04/04/2024 मधे तपासात जप्त केल्या होत्या. त्या तिन्ही मोटर सायकल फलटण शहर पोलिसांनी आणल्या आहेत. आणि आरोपी (१) गणेश बाळासो जाधव, वय १९ वर्षे, रा. जाधववाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर आणि (१) अनिल उर्फ संदीप दिलीप लोंढे, वय २५ वर्षे, रा. मेडद, तालुका माळशिरस यांना अटक करण्यात आली होती.
सध्या सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस हवालदार हेमा पवार या करीत आहेत.

Post a Comment
0 Comments