Type Here to Get Search Results !

निरा उजवा कालव्यामधील बेवारस मृतदेह महीलेची ओळख पटली.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण वैभव जगताप 

निरा उजवा कालव्यामधील बेवारस मृतदेह महीलेची ओळख पटली.



फलटण शहर पोलीस ठाणे, अपमृत्यू नोंद क्र. ४२/२०२४, कलम १९४ BNSS मधील मयत महिला ही ST स्टँड ते गोविंद डेअरी चे मधे असलेल्या कॅनाल मध्ये  दिनांक ०१/०७/२०२४ रोजी सायंकाळी ०६.४० वाजता वाहत आलेल्या महिलेची ओळख खालील प्रमाणे आहे 

मिळालेल्या माहितीनुसार सदर मयत महीलेचे नाव-कोमल तुफान वाघमारे वय ३० वर्ष रा.सगुणामातानगर,मलठण या.फलटण जि.सातारा.येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ओळख पटलेल्या मृतदेहाचे वर्णन खालीलप्रमाणे  

वय अंदाजे 35 ते 40 

वर्ण- गोरा

अंगात नेसणेस - काळया रंगाचा ब्लाऊज. लाल रंगाचा परकर 

हातात- हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या व पिवळसर रंगाच्य धातूच्या बांगड्या.

नाकात -पिवळ्या रंगाची चमकी. 

गळ्यात-दोन वाट्या असलेले मंगळसूत्र. 

कानात -पिवळसर रंगाची धातूची कर्णफुले व झुबे.

उजव्या हातावर अंगठ्याच्या खाली इंग्रजीत टी अक्षर गोंदलेले. 

पायाच्या अंगठ्या शेजारील बोटात पांढऱ्या रंगाची धातूची जोडवी. 

केस काळे. 

सदर या घटनेचा अधिक तपास फलटण शहर पोलीस निरीक्षक शहा हे करीत आहेत.


Post a Comment

0 Comments