Type Here to Get Search Results !

शाहुपूरी पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत कोंबीग ऑपरेशन राबवुन NBW वॉरंट मधील 05आरोपींना केले अटक व मा. न्यायालयाने सदर आरोपींना जेलमध्ये धाडले.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण /वैभव जगताप 

शाहुपूरी पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत कोंबीग ऑपरेशन राबवुन NBW वॉरंट मधील 05आरोपींना केले अटक व मा. न्यायालयाने सदर आरोपींना जेलमध्ये धाडले.


मा. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले, यांनी

पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सावंत्रे शाहुपुरी पोलीस ठाणे यांना शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये कोबींग

ऑपरेशन राबवुन NBW वॉरंट मधील आरोपी पकडणेबाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे दि.28/08/2024 रोजी सकाळी 05.00 वा. ते 09.00 वा. दरम्यान शाहुपूरी पोलीस ठाणे

हद्दीत कोबींग ऑपरेशन राबवुन NBW वॉरंट मध्ये फरार असणाऱ्या आरोपींचा गोपनिय व तांत्रिक

माहितीच्या आधारे शोध घेवुन आरोपी नामे 1) शोएब मोहम्मद हुसेन शेख रा. 323 बाबर कॉलणी सातारा

सेशन केस नं.367/2021 2) विशाल यशवंत पिलारे रा. 59 जंगी वाडा सातारा सेशन केस नं. 66/2019

3) सागर ऊर्फ नन्या रमेश इंदलकर रा. बसाप्पा पेठ सातारा सेशन केस नं.72/2018 4) सुरज ऊर्फ भैया

अशोक चौगुले रा.439 मंगळवार पेठ सातारा सेशन केस नं. 105/20285) अक्षय सुरज भंडारे रा. 210

गुरवार पेठ सातारा सेशन केस नं. 105/2018 यांना ताब्यात घेवुन मा.न्यायालयात हजर केले आहे.

अशाप्रकारे शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने सकाळी 05.00 वा. ते 09.00 वा. चे दरम्यान

शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीत कोबींग ऑपरेशन राबवुन NBW वॉरंट मधील 05 आरोपींना अटक करुन

त्यांना मा.न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपी नामे शोएब मोहम्मद हुसेन शेख यास

15,000/- रुपये दंड व इतर 4 आरोपी यांना जेल मध्ये धाडले आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजु

नवले, पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सावंत्रे यांचे मार्गदर्शनाखाली शाहुपुरी पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments