Type Here to Get Search Results !

महिलेच्या प्रामाणिकपणामुळे अडीच तोळ्याचा सोन्याचा डाग मूळ मालकास मिळाला परत.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

महिलेच्या प्रामाणिकपणामुळे अडीच तोळ्याचा सोन्याचा डाग मूळ मालकास मिळाला परत.


दिनांक २४/०७/२०२५ रोजी श्री. शिवाजी पाडूरंग नरूटे रा माळेगाव ता बारामती जि पुणे यांचे

श्री.भिवाईदेवी दर्शनाचे वेळी आडीच तोळे सोन्याचे मनी मंगसूत्र ठेवलेली पिशवी गहाळ झाली होती.

मा.पो नि महाडीक साहेब, पो.उ.नि. पवार साहेब फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांचे आदेशान्वये सदर

पिशवीचा पो हवा एम. एम. पिसे व पो हवा ए.यु. पवार यांनी श्री. भिवाईदेवी मंदीर परीसरात शोध

घेतला. तेव्हा रुकसाना कबिर शेख यांच्या प्रमाणीकपणामुळे सदरची पिशवी व त्यातील सोन्याचा

आडीच तोळयाचा डाग मिळून आला असून तो आज रोजी श्री. शिवाजी पाडूरंग नरूटे रा माळेगाव ता

बारामती जि पुणे यांना देणेत आला आहे. सदर शोध मोहिमेत नानासो भिसे (माजी सरपंच), गणेश

बिबे (पुजारी),नंदू विठ्ठल पवार, अक्षय नंदू पवार, राहूल नारायण पवार सागर भिसे तसेच सर्व

कांबळेश्वर ग्रामस्थ यांनी योग्य ती मदत केली आहे.

,

Post a Comment

0 Comments