Type Here to Get Search Results !

सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/वैभव जगताप 

सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा.



१५/०८/२०२५ रोजी सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज एच एस सी वोकेशनल विभाग साखरवाडी ता.फलटण येथे भारतीय स्वातंत्र्य दिन आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी स्कूल कमिटीचे चेअरमन श्री भोजराज नाईक निंबाळकर, व्हाईस चेअरमन श्री राजाराम बबनसो नाईक निंबाळकर , स्कूल कमिटी सदस्य,  प्रशालेचे प्राचार्य श्री. गोपाळराव  जाधव, सर्व शिक्षक , शिक्षिका,  शिक्षकेतर कर्मचारी ,पालक व विद्यार्थी उपस्थित होते. स्कूल कमिटीचे व्हाईस चेअरमन श्री राजाराम नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ध्वजसंचालन करून देशभक्ती गीतांवर कवायतीचे विविध प्रकार सादर केले. सर्व विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालय साखरवाडी येथे जाऊन ध्वजारोहण केले व पुन्हा प्रशालेत आल्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. यावेळी श्री लक्ष्मणराव नाईक निंबाळकर व श्री कृष्णा दादासो झेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वही , पेन व खाऊचे वाटप करण्यात आले तसेच सर्व शिक्षक,  शिक्षिका इतर कर्मचारी यांना अल्पोपहार देण्यात आला अशा प्रकारे भारतीय स्वतंत्र दिन आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री टिळेकर सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments