सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
महाराष्ट्र व इतर राज्यातून चोरीस(गहाळ) झालेले ४लाख२०हजार रु.किंमतीचे मोबाईल मुळ मालकांना केले परत.
(गुन्हेप्रकटीकरण शाखा वाई पोलीस ठाणे यांची दमदार कारवाई)
महाराष्ट्र तसेच इतर राज्यातुन चोरीस गेलेले व गहाळ झालेले एकूण २० मोबाईल व ०१ टॅब असे एकुण
०४ लाख २० हजार रुपये किंमतीचे शोध घेऊन तक्रारदार यांना वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक
श्री जितेंद्र शहाणे यांचे हस्ते केले परत
मा. तुषार दोषी साो पोलीस अधिक्षक सातारा मा. वैशाली कडुकर मॅडम अप्पर पोलीस अधिक्षक मा. श्री
बाळासाहेब भालचीम साो उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी मा.श्री जितेंद्र शहाणे पोलीस
निरीक्षक साो प्रभारी अधिकारी वाई पोलीस ठाणे यांना वाई शहर हे सातारा जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ
असुन, पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल गहाळ होण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सदर मोबाईल तक्रारीबाबत
गांभीर्याने लक्ष देऊन जास्तीत जास्त मोबाईल परत करण्याबाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने
गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व पो.कॉ विशाल शिंदे यांस योग्य ते मार्गदर्शन
करुन सदरचे गहाळ झालेले मोबाईलचा तात्काळ छडा लावण्याबाबत आदेश केला होता. त्यानुसार तात्काळ
कारवाई करीता महाराष्ट्र तसेच इतर विविध राज्यातुन गुन्हे प्रकटीकरण शाखेने एकुण २० मोबाईल ०१ टॅब
परत मिळवुन तक्रारदार यांना मा. पोलीस निरीक्षक साो वाई पोलीस ठाणे यांचे हस्ते परत केले.
वाई शहर ही सातारा जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ आहे त्यानुसार वाई शहरास एक मोठी ओळख
आहे. वाई शहरात आजुबाजुच्या गावातुन हजारोचे संख्येने लोक नोकरी रोजगार व शिक्षण व इतर बाजारपेठेमध्ये
खरेदी करण्यासाठी वाई शहरात येत जात असतात त्यावेळी प्रवासात बाजारपेठेत व इतर ठिकाणी मोबाईल
गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे. तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुन्हेप्रकटीकरण शाखेने महाराष्ट्र राज्याचे विविध
भागामधुन तसेच इतर राज्यातुन मोबाईल परत मिळवत गहाळ झालेले मोबाईल तक्रारदार यांना परत केल्याने
नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत प्रशंसनीय भावना व्यक्त करण्यात येत आहे.
माहे जाने २०२४ पासुन एकुण ३०० विविध कंपन्यांचे नामांकित मोबाईल वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने
तक्रारदार यांना परत केले आहेत.
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक साो श्री. तुषार दोषी, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती वैशाली
कडुकर मॅडम मा.उपविभागीय पोलीस अधिकारी साो वाई विभाग श्री. बाळासाहेब भालचिम, यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र शहाणे तपासपथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पो.कॉ विशाल
शिंदे,पो.कॉ हेमंत शिंदे, पो.कॉ नितीन कदम, पो.कॉ श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर, पो.कॉ महेश
पवार(सायबर) यांच्या पथकाने केली आहे. मा. पोलीस अधिक्षक साो श्री तुषार दोषी व मा. अप्पर पोलीस अधिक्षक
वैशाली कडुकर मॅडम यांनी वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment
0 Comments