सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
फलटण येथे अरविंद मेहता व सौ. इंदुमती मेहता यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस सोहळा थाटात साजरा.
फलटण, दि. ३ सप्टेंबर २०२५: ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता आणि सौ. इंदुमती मेहता यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त फलटण येथे श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या साहित्यकृतमहोत्सवी समारंभाला ফलटण आणि सातारा जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, पत्रकारिता, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अरविंद मेहता यांच्याशी असलेल्या दीर्घकालीन आणि निखळ मैत्रीच्या आठवणींना उजाळा देत मेहता दांपत्याला उत्तम आरोग्य, सुख आणि दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि श्रीमंत विश्वजीतराजे नाईक-निंबाळकर यांनीही उपस्थित राहून मेहता दांपत्याचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
हा सोहळा मेहता दांपत्याच्या पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करणारा तसेच त्यांच्या मैत्रीच्या अतुट बंधाचा उत्सव ठरला.

Post a Comment
0 Comments