सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
मराठा क्रांती मोर्चा, साखरवाडीच्या वतीने आज सायंकाळी नियोजन बैठक.
आपण सर्वांना माहीत आहेच आपले मनोजदादा जारांगे पाटील मुंबई येथे उपोषण करत आहेत तसेच त्यांनी सर्व मराठा समाजाला शनिवार, रविवार दि. 6/7 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे त्यासाठी आपण *साखरवाडी - पिंपळवाडी - होळ - जिंती - खुंटे - लाटे - फडतरवाडी - सुरवडी - खराडेवाडी - मुरूम - खामगाव - रावडी - इतर वाडी वस्त्या* यांना असे सुचित करण्यात येत आहे की आपण सर्वांनी शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी बरोबर 5 वाजता साखरवाडी बस स्टँड येथे यावे तिथून आपण कमीत कमी 100 गाड्या येऊन सर्व जण एकत्र मुंबई कडे मनोजदादा यांच्या आझाद मैदान मुंबई या उपोषण स्थळी पाठींबा देण्यासाठी जाणार आहोत . तरी आपण सर्वांनी आपल्या 4 व्हिलर गाड्या घेऊन यावे.जेणे करून आपण एकत्र सर्व जण बरोबर जाऊन आपले बहुमूल्य योगदान देऊ.
नियोजनासाठी आज दि 2 सप्टेंबर 2025 रोजी सायं. 6 वाजता विठ्ठल मंदिर पिंपळवाडी मिटिंग चालू होईल
टीप- वैयक्तिक कोणालाही फोन मेसेज केला जाणार नाहीत सर्वांनी या मेसेज च्या आधारावर दिलेल्या तारखेनुसार दिलेल्या टाइमिंगला येणे ही आपणा सर्वांना विनंती.
सकल मराठा समाज ,महाराष्ट्र राज्य.

Post a Comment
0 Comments