सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
फलटण ग्रामीण पोलीस, पो.नि. सुनील महाडिक यांच्या निरोप समारंभात भाऊक.
दि.२२ रोजी सायंकाळी ७ वा. फलटण ग्रामीण पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक श्री.सुनील महाडिक यांचा निरोप समारंभ व त्यांची पोलीस निरीक्षक (Pi) पदावरून पोलीस उपअधीक्षक (Dysp)पदी गडचिरोली येथे पदोन्नती झाल्या बद्दल त्यांना शुभेच्छा..! देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रम प्रसंगी काही पत्रकारांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. एक संवेदनशील, कार्यक्षम, आपल्या खात्याशी प्रामाणिक,देह बोली ही उपासक, अतिप्रसंग तत्परता, गोर गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्षक भुमिका घेणारा, पत्रकारांशी सुसंवाद साधणारा, आपल्या कर्तव्याशी तडजोड न करणारा, आपले कर्तव्य पार पाडत असताना समाजात सामाजिक सलोखा राखणारा, सुसंस्कृत विचार घेऊन काम करणारा आणि जाता,जाता आपल्या सवंगडींना उत्कृष्ट प्रबोधन करून जाणारा व पोलीस खात्याचा दर्जा वाढवणारा असा प्रभारी अधिकारी प्रत्येक पोलिस ठाण्यात मिळावा.अशा या सेवकाला दैनिक रोखठोकच्या वतीने आमचे सातारा जिल्हा विभाग प्रमुख वैभव जगताप यांनी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments