सह्याद्री निर्भिड न्यूज
गिरवी/अनिलकुमार कदम
जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत शर्वरी जाधव प्रथम क्रमाकांची मानकरी.
जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा ढवळ पाटी तालुका- फलटण येथे पार पडल्या. त्यामध्ये जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीच्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गिरवी तालुका- फलटण या विद्यालयातील शर्वरी भास्कर जाधव या विद्यार्थिनीने 19 वर्षाखालील 65 किलो वजन गटात फ्री स्टाइल कुस्तीमध्ये जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक मिळवला व विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली.
त्याबद्दल जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवी चे अध्यक्ष सह्याद्री कदम,जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक सचिव व सातारा जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती श्रीमती शारदादेवी कदम, महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम,सातारा जिल्हा परिषद सातारा येथील शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश कुंभार, गटशिक्षणाधिकारी अनिल सपकाळ, शिक्षण विस्तार अधिकारी दारासिंग निकाळजे,गिरवी केंद्र समुहाचे केंद्रप्रमुख सौ राजश्री कुंभार, सरपंच सौ वैशाली कदम, उपसरपंच संतोष मदने, प्राचार्य संजयकुमार सावंत क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक हिंदुराव लोखंडे व सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment
0 Comments