Type Here to Get Search Results !

फलटण नगराध्यक्षपदासाठी श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी द्यावी – फिरोज बागवान

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

फलटण नगराध्यक्षपदासाठी श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी द्यावी – फिरोज बागवान



फलटण नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुले झाले असून, राजे गटाकडून श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. गटातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी प्रमुखांना विनंती केली आहे की, अनिकेतराजे यांना उमेदवारी देऊन त्यांच्या नेतृत्वाला संधी द्यावी.


श्रीमंत अनिकेतराजे यांनी सिम्बायोसिस महाविद्यालयातून एल.एल.बी. पदवी प्राप्त केली असून, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात १५ वर्षांहून अधिक काळ यशस्वी वकील म्हणून कार्य केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रकरणे हाताळण्याचे त्यांचे कौशल्य आणि दूरदृष्टी त्यांना वेगळे ठरवते. 

सर्वसामान्य कार्यकर्ते आणि जनतेशी त्यांचे आपुलकीचे नाते, साधेपणा आणि प्रेमळ स्वभाव यामुळे ते लोकप्रिय आहेत. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत सौ. वैदेहीराजे यांचे सुसंस्कार लाभलेले अनिकेतराजे यांनी यापूर्वी नगरसेवक म्हणून काम केले असून, राजकारणात सक्रिय सहभाग घेतला आहे.


थेट जनतेतून पाच वर्षांसाठी निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे फलटणच्या राजकीय वातावरणात चुरस वाढली आहे. गेल्या तीस वर्षांपासून फलटण नगरपालिकेवर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे वर्चस्व आहे. यंदा ही सत्ता कायम राखण्यासाठी राजे गटाने श्रीमंत अनिकेतराजे यांना सक्षम उमेदवार म्हणून पुढे आणले पाहिजे.


राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर “फिक्स नगराध्यक्ष” म्हणून अनिकेतराजे यांच्या फोटोसह पोस्ट व्हायरल केल्या आहेत. या पोस्ट्समुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, त्यांच्या उमेदवारीला जोरदार पाठिंबा मिळत आहे. सोशल मीडियावर अनिकेतराजे यांच्या नावाची चर्चा तुफान रंगली आहे.


या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजे गटाने तयारी सुरू केली असून, श्रीमंत अनिकेतराजे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता कायम राखण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. अनिकेतराजे यांच्या शिक्षण, अनुभव आणि लोकसंग्रह यामुळे ते फलटणच्या विकासाला नवी दिशा देऊ शकतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.

Post a Comment

0 Comments