Type Here to Get Search Results !

फलटण येथे चौदा लाख सत्तावीस हजार रुपये किंमतीच्या सोन्याची चोरी.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

फलटण येथे चौदा लाख सत्तावीस हजार रुपये किंमतीच्या सोन्याची चोरी.



दि.२९/१०/२५ रोजी रात्री शिवशक्ती चौक रविवार पेठ फलटण येथील अक्षय जितेंद्र जोशी वय वर्ष 32 व्यवसाय ड्रायफ्रूट व्यावसायिक यांच्या राहत्या घरातील बेडरूमचे सेफ्टी डोअर दरवाजचे कडी- कोयंडा तोडून बेडरूम मध्ये प्रवेश करून १४,२७,००७/- रू किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये अक्षय जितेंद्र जोशी यांनी दिली आहे. 

सदर चोरी मध्ये चोरीस गेलेला मुद्देमाल खालील प्रमाणे:-

१)३,७७,२३५/-रु. किमतीचे ६३ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे मंगळसूत्र 

२)३,९७,५५०/-रु. किमतीचे ६६ ग्रॅम वजनाचे चार सोन्याचे चोकोर.

३)२,५९,१५१/-रु. किमतीच्या ४३ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे कंगन.

४)३,८९,२४९/-रु. किमतीचा ६५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या. बांगडया.

५)१२५७/-रु. किमतीचे ०.२१ मिली वजनाचे सोन्याचे स्क्रू.

६)२५६५/-रु. किमतीचे ०.४५ मिली वजनाची सोन्याची एक नथ.

असा एकूण १४,२७,००७/-रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेलेला आहे. तरी या सदर घटनेचा अधिक तपास फलटण शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करित आहेत.

Post a Comment

0 Comments