सह्याद्री निर्भिड न्यूज
सोमंथळी/तानाजी सोडमीसे
सोमंथळी येथील दक्षिण मुखी मारुती मंदिरात कार्तिक एकादशी निमित्त काकड आरती उत्साहात संपन्न.
काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती होय
सोमंथळी कार्तिक एकादशीच्या पवित्र दिवशी सोमंथळी येथील सुप्रसिद्ध दक्षिणमुखी मारुती मंदिरात पहाटे काकड आरतीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला गेल्या शंभर वर्षाहून अधिक जुन्या परंपरेनुसार या हि वर्षी हजारो भाविक भक्तांनी या सोहळ्यात भाग घेतला पहाटेच्या शांत वातावरणात भजन, टाळ मृदंगाच्या गजरात काकड आरती करण्यात आली मंदिरातील या अनोख्या परंपरेमुळे भाविकांना सोमंथळी गावातील भजनी मंडळांनी राज्यस्तरीय भजन स्पर्धेत खुल्या गटातून द्वितीय क्रमांक मिळवला त्यांच्या भजनात असलेली भक्ती, श्रवणीत सूर, तालबद्ध वादन, भक्ती भावात असलेली एकजूट आणि या साठी घेतलेले अपार मेहनत भाविक भक्तांना यानिमित्ताने यांच्या कलेचा आनंद घ्यावयास मिळाला.
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने सोमंथळी येथील पवित्र निरा नदीमध्ये हजारो भाविकांनी दीपप्रज्वलन केले नदीच्या काठावर भाविकांनी तिळाच्या तेलाचे, तुपाचे दिवे लावून प्रार्थना केली ज्यामुळे नदीकाठ उजळून निघाला होता दीप प्रज्वलनाला विशेष धार्मिक महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी असे केल्याने घरात सुख शांती समृद्धी येते भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे नदीकाठ एक सुंदर मंगलमय दृश्य तयार झाली होते

Post a Comment
0 Comments