Type Here to Get Search Results !

अपघाताचा बनाव करुन खून करणाऱ्या आरोपींचा शिरवळ पोलिसांनी बनाव उघड करुन ९ आरोपीना केलीअटक.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

अपघाताचा बनाव करुन खून करणाऱ्या आरोपींचा शिरवळ पोलिसांनी बनाव उघड करुन ९ आरोपीना केलीअटक.



शिरवळ पोलीस ठाणे गु.र.नं. ४४६ / २०२५ भा. न्या. संहिता कमल १०३(१), ३(५) प्रमाणे

दाखल असले गुन्हयातील ३ आरोपींना १२ तासात शिताफीने शिरवळ पोलीसांकडून अटक

करण्यात आली असून त्यांची दिनांक ६/१/२०२६ पर्यंत ०९ दिवस पोलीस कोठडी मंजुर केली

आहे. आज रोजी आणखी ६ आरोपीतांना असे एकून ९ आरोपीतांना शिरवळ पोलीसांकडून अटक

शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत मौजे पळशी ता. खंडाळा गावचे हद्दीत दहाबिगा नावचे

शिवारात पळशी-वडगाव - जाधव वस्ती रेसकोर्सकडे जाणारे तिकाटण्यातील डांबरी रस्त्यावर आणि

पळशी येथील न्यू इंग्लिश स्कूल येथील घडले घटनेतील संशयीत आरोपींनी आपसात संगनमत

करुन मयतास डोक्यात, तोंडावर, पाठीवर मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. तेव्हा जखमी

नामे अतिश अशोक राऊत रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा यांस उपचाराकरिता सिव्हील

हॉस्पीटल, सातारा व तद्नंतर सह्याद्री हॉस्पीटल पुणे येथे अॅडमीट केले असता तो उपचारादरम्यान

मयत झाला आहे. यातील आरोपीतांनी अतिश राऊत याचा अपघातात मृत्यु झाला असे भासवून

खुनाची घटना लपविण्याचा प्रयत्न केला होता. त्याची माहीती पोलीसांना मिळताच पोलीसांनी

तात्काळ आरोपीतांचा डाव हाणून पाडून अतिश याचे वडीलांनी दिलेल्या तक्रारीनुसार विनाविलंब

खुनाचा गुन्हा आरोपीतांविरुध्द दाखल करण्यात आलेला आहे.

सातारा पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रीमती वैशाली

कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण श्री. विशाल खांबे यांनी घडलेल्या घटनेची

गंभीरता लक्षात घेतली. या कामी तात्काळ शिरवळ पोलीस ठाणे येथील पोलीसांना आरोपीतांचे

तपासकामी सुचना दिल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण श्री. विशाल खांबे हे स्वत

शिरवळ पोलीस ठाणे येथे सुरवातीपासून समक्ष हजर राहुन गुन्हा दाखल करण्याच्या सुचना देवून

आरोपी शोध घेणेबाबत बातमीदार व इतर आवश्यक सुचना देवून वेगवेगळी तपास पथके तयार

करुन सहा.पोलीस निरीक्षक सुशिल भोसले लोणंद पोलीस ठाणे, सहा पोलीस निरीक्षक किर्ती

म्हस्के, यांचेसह अंमलदार यांचे टिम रवाना केल्या. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या

माहीतीच्या आधारे १२ तासात १) तेजस बाळासाो भरगुडे वय ३४ वर्षे रा. पळशी ता खंडाळा जि.

सातारा, २) दिपक बाळासाो भरगुडे वय ३२ वर्षे रा. पळशी ता खंडाळा जि. सातारा, ३) ऋषिकेश

जगन्नाथ मळेकर वय २८ वर्षे रा. शिंदेवाडी ता. खंडाळा जि. सातारा यांना अटक केली. यातील

Scanned with OKEN Scanner

आरोपींकडे अधिक तपास केला. त्यांनी गुन्हयात वापरलेली हुंडाई आय-१० कार, लाकडी दांडके व

इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच गुन्हयातील इतर आरोपी ४) अविष्कार अनिल

भरगुडे वय २५ वर्ष ५) ऋषिकेश रामचंद्र भरगुडे वय २७ वर्ष ६) नितिन पांडुरंग भरगुडे वय ३२

वर्ष ७) गणेश साधु भरगुडे वय २६ वर्ष ८) सागर धनाजी भरगुडे वय ३६ वर्ष ९) तुषार दत्तात्रय

भरगुडे वय ३५ वर्ष सर्व रा पळशी ता. खंडाळा जि. सातारा यांना आज रोजी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर अपर

पोलीस अधीक्षक सातारा, श्री. विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग फलटण

यांचे मार्गदर्शनाखाली यशवंत नलावडे पोलीस निरीक्षक शिरवळ पोलीस ठाणे सहा. पोलीस

निरीक्षक सुशिल भोसले लोणंद पोलीस ठाणे सहा पोलीस निरीक्षक किर्ती म्हस्के, पोउपनि सतिश

आंदेलवार, तसेच सफौ विलास यादव, संजय सपकाळ, नितिन नलवडे, सचिन वीर, सुनिल मोहरे,

तुषार कुंभार, प्रशांत धुमाळ, अजय झुंजार, अजित बोराटे, अरविंद बा-हाळे, भाऊसाहेब दिघे,

अक्षय बगाड, मंगेश मोझर, दिपक पालेपवाड, अक्षय नेवसे, धीरज टिळेकर यांनी केलेली आहे.

तसेच शिरवळ पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते की, नागरिकांना कोणाविषयी काही

तक्रार किंवा संशय असल्यास त्याबाबत आपण स्वत कायदा हातात घेवू नये, याबाबत कायदेशीर

मार्गाचा अवलंब करत पोलीस ठाणेशी संपर्क साधावा पोलीस आपल्या मदतीसाठी कायम हजर

आहेत. असे आवाहन शिरवळ पोलीस ठाणे मार्फत करण्यात येत आहे. या घडलेल्या गुन्हयाबाबत

कोणास काही माहिती मिळाल्यास पोलीस निरीक्षक श्री यशवंत नलावडे यांना मोबा. नं.

९५८८६०९९११ यावर कळवावी आपले नाव गोपनीय ठेवणेत येईल याची हामी देण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments