Type Here to Get Search Results !

राजेंद्र विद्यालयात किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन....

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

राजेंद्र विद्यालयात किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन....




राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त,राजेंद्र माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय खंडाळा येथे,मानस प्रकल्प अंतर्गत,

निरामय हेल्थ फाउंडेशन व एशियन पेंट यांच्या संयुक्त विद्यमाने, किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले, यावेळी निरामय हेल्थ क्लबच्या समन्वयक कुमारी  यशवंती होनमाने यांनी मासिक पाळी चे महत्व,त्यामध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल,ताणतणाव व भीती यावर सखोल प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन  केले.यावर प्रश्न उत्तराच्या सत्रात विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. यावेळी विद्यालयाला सॅनिटरी व्हेंडींग.मशीन भेटवस्तु म्हणून देण्यात आले.  या कार्यक्रमासाठी सौ.पठाण मॅडम यांनी सुत्रसंचलन केले.याप्रसंगी राजेंद्र माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उपप्राचार्य सौ अरुंधती गाढवे,उपमुख्याध्यापिका,सौ सुशीला मोहिते ,महिला शिक्षिका,आरोग्यसेविका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार सौ.शितल कोंढाळकर मॅडम यांनी केले.

Post a Comment

0 Comments