Type Here to Get Search Results !

साखरवाडी येथील श्री ग. वि.भोसले प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/ हरिदास सावंत (सर) 

साखरवाडी येथील श्री ग. वि.भोसले प्रतिष्ठानच्या  वतीने इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन.




साखरवाडी ता. फलटण , जि. सातारा येथील श्री गणपत विठ्ठल भोसले प्रतिष्ठानच्या वतीने साखरवाडी परिसरातील इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे अध्यक्ष श्री सचिन भोसले , उपाध्यक्ष श्री संजय भोसले आणि सचिव श्री हरिदास सावंत सर यांनी संयुक्तपणे सांगितले आहे.प्रतिष्ठानचे सदस्य श्री अमोल गणपतराव भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रोख रुपये ३०००/- , द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रुपये २०००/- व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रुपये १०००/- दिले जाणार असून सोबत स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल.तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकालाही प्रमाणपत्र व उत्तम प्रकारचे पेन देवून गौरविण्यात येणार आहे. स्पर्धा प्रवेश विनामूल्य आहे.          स्पर्धेसाठी अधिक माहिती देताना प्रतिष्ठानचे सचिव श्री हरिदास सावंत यांनी स्पष्ट केले आहे की , स्पर्धा रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत साखरवाडी बाजारपेठेतील श्री भवानी माता मंदिरात संपन्न होतील. एकूण ३० प्रश्न व ६० गुणांच्या या स्पर्धेचे गुणदान वजाबाकी पद्धतीने ( Mynus system) केले जाणार असून प्रत्यक्ष स्पर्धे वेळी याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. स्पर्धकासोबत आपापल्या शाळेचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे.त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी - विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन श्री सचिन भोसले , श्री संजय भोसले , श्री हरिदास सावंत सर आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी केले आहे.आपला प्रवेश ९६८९८६८२३३  किंवा ९८९०४२०५२० किंवा ९४२३२३२३१५ या पैकी कोणत्याही एका नंबर वर संपर्क साधून निश्चित करावा .

Post a Comment

0 Comments