सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
फलटण तालुक्यातील होळ येथील बनावट दूध प्रकरण उघड : 5 जणांविरोधात गुन्हा दाखल.
फलटण, 13 जुलै 2026 : फलटण तालुक्यातील होळ गावात मानवी आरोग्यास घातक कृत्रिम दुधाची निर्मिती करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
अन्न सुरक्षा अधिकारी म्हात्री आप्पासाहेब खापणे (वय 48) यांनी 12 जुलै 2026 रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार 12 जुलै 2026 रोजी सकाळी 10:35 ते 11:00 वाजण्याच्या सुमारास होळ, ता. फलटण येथे ही कारवाई करण्यात आली.
आरोपींनी whey permeate powder spray dried आणि instant tea coffee creamer non dairy creamer spray dried या पावडरचा वापर करून कृत्रिम दूध तयार केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. ही पावडर केवळ दुग्धजन्य पदार्थ उत्पादक किंवा अन्य अन्न पदार्थ उत्पादकांनाच विक्रीसाठी अभिप्रेत आहे. मात्र आरोपींनी ती थेट ग्राहकांसाठी दुधात मिसळली.
कसे बनवत होते बनावट दूध?
आरोपींनी गोरखाला फसवण्यासाठी दोन्ही पावडरमध्ये ब्रांडेड पाणी घालून एकजीव करून कृत्रिम, भेसळयुक्त, असुरक्षित व मानवी आरोग्यास घातक दूध तयार केले. श्री. मोरे यांनी ही पावडर पुरवली तर सोमनाथ डेअरीच्या मालकांनी हे दूध मानवी आरोग्यास हानिकारक असल्याची जाणीव असूनही जाणीवपूर्वक विकत घेतले.
सर्व आरोपींनी परस्पर संगनमताने, संघटितपणे हे कृत्य करून नागरिकांच्या जीवितास व आरोग्यास गंभीर धोका निर्माण केल्याचा ठपका फिर्यादीत ठेवण्यात आला आहे.
कोणत्या कलमांखाली गुन्हा?
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 415/2026 नोंदवण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 61, 123, 274, 275, 3(5) तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 चे कलम 26, 27, 3(1)(zz)(i), 3(1)(zz)(iv), 3(1)(zz)(v) आणि अन्न सुरक्षा नियमन 2011 चे नियमन 2.1.1.(2)(10) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पुढील कारवाई
या प्रकरणाचा तपास पोहवा 2142 पिसे हे करत आहेत. पोलिसांनी आरोपींना अटक करण्याची तजवीज ठेवली असून गुन्ह्याची सखोल चौकशी होणार आहे, असे पो. नि. भुजबळ राव, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी कळवले आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना दूध खरेदी करताना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद दूध आढळल्यास तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा.

Post a Comment
0 Comments