सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/वैभव जगताप
सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, साखरवाडी येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी.
साखरवाडी, ता. फलटण बुधवार दि. २२ जुलै २०२६ रोजी सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, साखरवाडी येथील किमान कौशल्य विभागात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेचे प्राचार्य मा. गोपाळराव जाधव सर यांच्या हस्ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक रवींद्र टिळेकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सामाजिक, राजकीय तसेच सहकार क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची सविस्तर माहिती दिली. अजितदादांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी केलेले कार्य, त्यांची प्रशासनावरील पकड आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यावर त्यांनी प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार किसन भोसले उपस्थित होते. तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रशालेच्या मराठी विभागाचे प्रमुख टिळेकर सर यांनी केले, तर प्रशालेतील क्रीडा विभागाचे प्रमुख नानासो तांबे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

Post a Comment
0 Comments