Type Here to Get Search Results !

सासवड मधील युवा ग्रामपंचायत सदस्यांनी स्वखर्चाने तयार केले चार रस्ते व एक पूल

 सासवड मधील  युवा ग्रामपंचायत सदस्यांनी स्वखर्चाने तयार केले चार  रस्तेव एक पूल 




प्रतिनिधी /वैभव जगताप 

         चांगले रस्ते हे विकासाची दिशा ठरवतात .गावात येणारे आणि गावातून वाड्या वस्त्यांवर जाणारे रस्ते चांगले व सुस्थितीत असणे म्हणजे गाव प्रगतीच्या दिशेने चालले आहे असे मानले जाते .वीज ,पाणी आणि रस्ते ह्या अत्यंत प्राथमिक गरजा आहेत देश आपला स्वातंत्र्याचा  अमृतमोहत्सव साजरा करतोय पण याच वेळी सासवड ता फलटण येथील पाच वस्त्यांना जाण्यासाठी रस्ते नसावेत पावसाळ्यात गाड्या एक ते दोन किलोमीटर बाहेर सोडून चिखल तुडवत वस्त्यांवर जावे लागते गेल्या तीस ते पस्तीस वर्षांची मागणी असूनही इथल्या लोकांना पक्के रस्ते मिळू नयेत वारंवार प्रशासनाला सांगूनही कुणी दखल घेत नव्हते. 

          तेव्हा सासवड येथील युवा उद्योजक व ग्रामपंचायत सदस्य असणारे श्री.अमोल रासकर व श्री. नंदकुमार झणझणे यांनी एकत्र येऊन स्वखर्चाने हे पाचही रस्ते करायचे असा निर्णय घेतला हे काम वाटते तेवढे सोपे नव्हते .म्हणजे सरकारी अंदाजपत्रका नुसार कमीत कमी पन्नास लाख खर्च आला असता एवढ्या किमतीचे काम गावातील तरुण युवा उद्योजकांनी करून दाखवले ते सुद्धा स्वखर्चाने या कामामध्ये पहिला घाडगेवाडी-सासवड रस्ता ते कोळेकर वस्ती रस्ता,दुसरा रस्ता एम डी आर 5 ते वडाचामळा रस्ता तिसरा मार्ग एमडीआर5 ते गाढवेवाडी रस्ता चौथा रस्ता कारंडेआळी रस्ता आणि सासवड -तरडगाव  ओढ्यावरील तामखडा रस्त्यावरील पूल या युवकांनी गावासाठी करून दिले 

             प्रत्येक गावात असते त्या प्रमाणे इथेही या युवकांना राजकीय कुटनीतीचा सामना करावा लागला परंतू त्याला न जुमानता वर्षानुवर्षे पडून असणारे चार रस्ते व एक पूल आज तयार आहेत या तरुणाचं म्हणणं एवढंच आहे की कोणतंही काम करण्यासाठी इच्छा शक्ती हवी असते आणि गावातील लोकांचं पाठबळ हे दोन्ही आमच्याकडे होते त्यामुळे चांगल्या कामाला काही जणांनी विरोध केला पण गावातील सामान्य लोकांपुढे त्यांचं काही चाललं नाही 

            हे रस्ते तयार करण्यासाठी गेले 2-3 महिने इतके दिवस लागले.त्यासाठी रस्त्यान्ची गरज हीच मुख्य समस्या असल्याने  ज्यात्या वस्ती तील सर्व युवा वर्गाचे व शेतकरी वर्गाने पूर्ण वेळ देऊन सहकार्य केले.  रस्त्यासाठी 

जमीनअदिग्रहनातील समस्या मुळे व आपापसातील वाद यामुळे खरेतर हे रस्ते रखडण्याचे मुख्य कारण होते आणि हेच मुख्य करणे सांगत गावपातळीवरील पुढारी हे रस्ते करण्यासाठी गेली अनेक वर्षे टाळाटाळ करत असतं.

यावर मार्ग काढण्याचा चंगच जणू श्री नंदकुमार झणझणे व अमोल रासकर यांनी बांधला. त्यांनी स्थानिक लोकांच्या गाटी भेटी घेतल्या त्यांची रस्त्यामुळे होतं असलेली परवड आणि त्यामुळे त्यांचे व इतरांचे त्यातून होणारे हाल याची जाणीव करून दिली. आणि त्यातून त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नला शेवटी यश आलं लोकांच्यातील आपापसातील वाद संपवून वस्तीनवरील  युवा तरुणवर्ग व ज्येष्ठ नागरिक यांनी पुढे येऊन,सामुदायिक श्रमदान करून उत्तम पद्धतीचे मुरमिकरनाचे रस्ते करण्यात सहकार्य दाखवले. या लोकांच्या एकजुटीमुळे व स्थानिक शेतकरी ज्यांच्या जमिनीतुन रस्ता आहे त्यांच्या सहकार्यामुळेच हे रस्ते करणे शक्य झाले.त्याबद्दल  संबंधित शेतकरी व युवावर्ग यांचे दोन्ही युवा ग्रामपंचायत सदस्यांनी  आभार व्यक्त केले.

     श्री. नंदकुमार झणझणे व श्री अमोल रासकर यांनी अश्या पद्धतीने स्वखर्चाने रस्ते व पूल बनवून दिल्याने सासवड पंचक्रोशीत त्यांच्या कामाची चर्चा होतं असून. स्थानिक लाभार्थी नागरिक त्यानंच्या रस्त्याची समस्या दूर केल्याबद्दल या युवा ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानत असून त्यांच्याप्रति विश्वास व्यक्त करीत आहेत. अमोल रासकर व नंदकुमार झणझणे यांच्या या उपक्रमाबद्दल श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर व श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर यांनी त्यांचे कौतुक केले.

https://chat.whatsapp.com/EAcU5UeglYl6sOte0VCfZL

Post a Comment

0 Comments