महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल तालुका महाबळेश्वर यांच्यावतीने नवनियुक्त मुख्याधिकारी यांचे स्वागत.....
:
महाबळेश्वर/प्रतिनिधी
महाबळेश्वर नगरपालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी पदाचा पदभार योगेश बाळकृष्ण पाटील यांनी बुधवारी स्वीकारला यापूर्वी संभाजीनगर जिल्ह्यातून फुलंब्री नगरपंचायत, सांगली जिल्ह्यातील शिराळा या ठिकाणी मुख्याधिकारी पदाची धुरा त्यांनी सांभाळली होती. महाबळेश्वर मुख्याधिकारी पदावर योगेश पाटील यांची नियुक्ती झाली आहे. नवनियुक्त मुख्याधिकारी यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल ऋषिकेश वायदंडे,शहर अध्यक्षा सायराबानू शेख, संपर्कप्रमुख पुजाताई कारंडे,संघटक नुरजाहा खारखंडे,नेहाताई जाधव, अख्तर माहपुळे, मेहबूब शेख,आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments