श्रीमती मीनलबेन मेहता कॉलेज पाचगणी मधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे अभिनव पद्धतीने रक्षाबंधन.....
महाबळेश्वर प्रतिनिधी : राहुल शेलार
महाबळेश्वर (सातारा)
३१ऑगस्ट २०२३, रोजी श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज पाचगणी येथील वनस्पतीशास्त्र विभागाने अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले.पाचगणी हे ठिकाण जैवविविधतेने समृद्ध असून तिथे अनेक प्रकारची वृक्षसंपदा आढळून येते,परंतु मानवी हस्तक्षेपामुळे येथील वृक्षसंपदा धोक्यात येत आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीआणि प्राध्यापकांनी येथील वृक्षांना राखी बांधून त्यांचे रक्षण आणि जतन करण्याचा निश्चय केला आहे. सदर प्रसंगी वनस्पतीशास्त्र विभागातील विभाग प्रमुख डॉ.प्रियदर्शनी कांबळे यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना निसर्गाचे संरक्षण व संवर्धन याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तसेच वनस्पतीशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग दर्शविला. कुमारी प्रियांका यादव कुमारी उनेजा सय्यद यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच कुमारी स्नेहा कांबळे यांनी आभार मानले.



Post a Comment
0 Comments