Type Here to Get Search Results !

सोमंथळीच्या स्वयंभू हनुमान मंदिरामध्ये महाप्रसाद व धार्मिक कार्यक्रम संपन्न

 सोमंथळीच्या स्वयंभू हनुमान मंदिरामध्ये महाप्रसाद व धार्मिक कार्यक्रम संपन्न 



प्रतिनिधी /तानाजी सोडमिसे

सोमंथळी ता. फलटण जि. सातारा येथील दक्षिण मुखी स्वयंभू श्री. हनुमान मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते या श्री. हनुमानाला नवश्या मारुती म्हणूनही संबोधले जाते. तसेच लव व कुश यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सोमंथळीच्या भूमीमध्ये श्रावणी  शनिवारचे औचित्य साधून प्रवचन, कीर्तन, गायन, जपसंकुलन, आरती अशा अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. ९ सप्टेंबर २०२३ रोजी श्रावणाच्या शेवटच्या शनिवार निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या हनुमानाच्या दर्शनासाठी पुणे, सोलापूर, पंढरपूर, बारामती तसेच दूरवरून भावीक भक्त येत.व सोमंथळीगावच्या सासरवासनी ही या दिवशी आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी येत. व  या भक्तिमय पावन भूमी मध्ये प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी अचानक दर्शनाचा व महाप्रसादाचा आनंद घेतला. तसेच हजारोच्या संख्येने महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घेतला.

याप्रसंगी प्रांताधिकारी सचिन ढोले साहेब यांचा गावातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुख्य संपादक •वैभव जगताप

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -८००७८५२१२१

Post a Comment

0 Comments