चंद्रयांन ३ चे इस्त्रोचे अधिकारी डॉ श्री एस व्ही शर्मा यांची तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र महाबळेश्वरला सदिच्छ भेट ....
प्रतिनिधी /महाबळेश्वर
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या कष्टाचं सोनं झालं आहे. चंद्रयान दोन अंतिम टप्प्यात आलेलं अपयश चांद्रयान तीनच्या माध्यमातून पुसून काढण्यात आलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे.चंद्रयान लँडिंग यशस्वी होणारच असा ठाम विश्वास भारतीय अवकाश संशोधन संस्थेने इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला होता व तो जगासमोर खरा करून दाखवला आहे. याच भारत केंद्र सरकारचे इस्त्रोचे चंद्रयान मोहीम तीन मधील डेपोटी अधिकारी श्री.डाॅ.एस.व्ही.शर्मा सर यांनी सहकुटुंब श्रावण महिना सुरू असताना महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेतील महाबळेश्वर तालुक्यातील तीर्थक्षेत्र श्रीक्षेञ महाबळेश्वर येथे स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी सरपंच सुनिल बिरामणे, जिवन महाबळेश्वरकर, प्रदिप काञट, राजेद्र पुजारी, अनिल जाधव, प्रशांत काञट, पुजारी विनायक लांगी उपस्थित होते.
मुख्य संपादक :वैभव जगताप
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क :८००७८५२१२१

Post a Comment
0 Comments