महाबळेश्वर नगरपालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी पदाचा पदभार श्री योगेश बाळकृष्ण पाटील यांनी स्वीकारला
महाबळेश्वर (सातारा)
यापूर्वी संभाजीनगर जिल्ह्यातून फुलंब्री नगरपंचायत, सांगली जिल्ह्यातील शिराळा या ठिकाणी मुख्याधिकारी पदाची धुरा त्यांनी सांभाळली होती. महाबळेश्वर मुख्याधिकारी पदावर योगेश पाटील यांची नियुक्ती झाली आहे. नवनियुक्त मुख्याधिकारी यांचे स्वागत शाल व पुष्पगुच्छ देवून करण्यात आले. नवनियुक्त मुख्याधिकारी यांच्याबरोबर महाबळेश्वर मधील पर्यावरण व पर्यटनाबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हा संपर्कप्रमुख राहुल शेलार, शहर अध्यक्ष राजेश सोंडकर, उपाध्यक्ष चैतन्य दवे, कार्याध्यक्ष रियाज मुजावर, खजिनदार मिलिंद काळे उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments