Type Here to Get Search Results !

महाबळेश्वर मधील वनविभाग व महसूल विभागाचा गोलमाल कारभार -सूर्यकांत पांचाळ

प्रतिनिधी /महाबळेश्वर 

 महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आमशी येथील अवैध उत्खननास दंडात्मक कारवाईस विलंब प्रकरणी  जिल्हाधिकारी सातारा कडे कारवाईची  मागणी : सुर्यकांत पांचाळ

 मौजे आमशी तालुका महाबळेश्वर हद्दीत महाबळेश्वरहुन तापोळ्याकडे जाताना मुख्य रहदारीच्या रस्त्यापासून काही अंतरावरावरील भीमनगर नागरी वस्तीच्या जवळ डोंगर उताराची वृक्ष राईने व्यापलेली काही एकरातील सर्व्हे क्र. २२ च्या पोट हिस्सात व स.नं २०/१ मिळकतीत  मागील सहा ते सात महिन्यांपूर्वीच्या कालावधी पासून मिळकतीच्या मिळकत धारकाकडुन जेसीबी व पोकलेन यंत्राच्या साह्याने या मिळकतीमध्ये राजरोसपणे असणारी वृक्षराई मुळांपासून उपसुन अनेक झाडांची हानी करुन पर्यावरणाचे नुकसान करुन जमिनींचे प्रचंड प्रमाणात विनापरवाना उत्खनन करून टप्या टप्प्यात सपाटीकरण करण्यात आले आहे.


                  याबाबत सविस्तर वृत्त असे की,आमशी गावाचे हद्दीतील सर्व्हे क्र.२२ च्या पोट हिस्सा मिळकत धारकाकडुन वृक्ष व पर्यावरणाची प्रचंड हानी करून विकास कामांसाठी विनापरवाना उत्खनन करून सुरु असलेल्या जमिन सपाटीकरण चे कामाबाबत मिळकत धारकावर कारवाई करुन पर्यावरणाचे नुकसान थांबविण्यसाठी भीमनगर येथील स्थानिक नागरिक तथा वंचित बहुजन आघाडी महाबळेश्वर तालुका अध्यक्ष श्री उत्तम भालेराव यांनी शासन दरबारी लेखी तक्रार अर्ज केले आहेत.  तक्रार अर्जात नमूद केले नुसार आमशी हद्दीतील ज्या सर्व्हे क्र २२ च्या पोट हिस्सा मिळकती मध्ये वृक्षांची व पर्यावरणाची हानी करून जमिनींचे सपाटीकरण करण्याचे काम थांबविण्यासाठी तत्कालीन स्थानिक तलाठी श्री वनवे तसेच तत्कालीन तहसीलदार सौ सुषमा पाटील यांना समक्ष भेटून सांगितले असल्याचे तक्रार अर्जात नमूद केले आहे. तत्कालीन तलाठी वनवे यांनी दि.५/१२/२०२२ रोजी  मौजे आमशी येथील सर्व्हे क्र २२/३ चे मिळकत धारक अभिनंदन धोतरे, राहुल सोळंकी, अरिहंत चौगुले,अमित पाटील यांनी विनापरवाना उत्खनन केल्या बाबत रिपोर्ट करुन पंचनामा तहसीलदार महाबळेश्वर यांच्या कडे सादर केला होता व आहे. 

               


 तलाठी श्री वनवे यांनी दि. ५/१२/२०२२ रोजी पंचनामा  करून कारवाई सुरू असल्याचे  कागदोपत्री दाखवले असले तरी प्रत्यक्षात सर्व्हे क्र २२ च्या पोट हिस्सा मिळकतीमध्ये विनापरवाना उत्खनन  सुरू केल्या पासून दोषी आढळणाऱ्या मिळकत धारकावर तलाठी श्री वनवे यांनी वेळीच तात्काळ फौजदारी कारवाई करून पोकलेन, जेसीबी, ट्रॅक्टर, इ. यांत्रिक मुद्देमाल जप्तीची कारवाई केली नसल्यामुळे मिळकत धारकांनी पुढील काही महिने प्रशासकीय कारवाईची भीती व तमा न बाळगता युध्द पातळीवर मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू ठेऊन पर्यावरणाची हानी करून जमिनींचे मोठ्या प्रमाणात बेसुमार सपाटीकरण केल्याचे दिसून येत आहे. 

            दरम्यानच्या काळात मौजे आमशी येथील तलाठी श्री वनवे यांच्याकडून उत्खननाचा पंचनामा करुन देखील विनापरवाना उत्खनन सुरू ठेवल्यामुळे ते त्वरित थांबवून मिळकत धारकावर फौजदारी कारवाई  केली जात नसल्याने व मिळकत धारकांनी पर्यावरणाचे नुकसान करुन बेसुमार उत्खनन सुरूच ठेवल्यामुळे मुळ तक्रार अर्जदार श्री उत्तम भालेराव यांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे   तक्रार अर्ज दाखल करुन सर्व्हे क्र २२ चे पोट हिस्सातील परिसरात पर्यावरणाची हानी करून बेसुमार विनापरवाना उत्खननाबाबत मिळकत धारकावर फौजदारी कारवाई करून  मिळकत धारकांकडून शासकीय नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू ठेवले असताना उत्खनन थाबविण्याबाबत मिळकत धारकावर ठोस कारवाई केली नसल्यामुळे  तत्कालीन तहसीलदार सौ सुषमा पाटील तसेच   तलाठी श्री वनवे यांच्यावर  प्रशासकीय नियमानुसार शिस्त भंगाची कारवाई करण्या संदर्भात मागणी केली आहे.

                मुळ तक्रार अर्जदार श्री उत्तम भालेराव यांनी तहसीलदार महाबळेश्वर कार्यालय येथे माहिती अधिकार २००५ अन्वये दि. २७/१/२०२३ रोजी मौजे आमशी येथील विनापरवाना उत्खनन केल्या बाबत पंचनामा कागदपत्राची नक्कल मागणी केली असता माहिती नुसार मौजे आमशी येथील सर्व्हे क्र २०/१ व २२/२ या मिळकतीमध्ये विनापरवाना उत्खनन केल्या बाबत दि. २८/१२/२०२२ रोजी पंचनामा केल्याचे दिसून येत आहे. या पंचनाम्यावरुन तहसीलदार महाबळेश्वर यांनी एप्रिल २०२३ रोजी सर्व्हे क्र २०/१ व २२/२ चे मिळकत धारक श्री आनंदकुमार केडीया यांना ३६० ब्रास विनापरवाना उत्खनन केल्या प्रकरणी रक्कम रु.८५,३५,९१२ रु. इतक्या रक्कमेची दंडात्मक कारवाई आदेश केला आहे.

                    जनमाहिती अधिकारी यांच्याकडे  दि.२८/६/२०२३ रोजी श्री सुर्यकांत पांचाळ यांनी केलेल्या माहिती अधिकारात अर्जावर दि.२७/७/२०२३ रोजी दिलेल्या उत्तरावरुन अशी बाब निदर्शनास आली आहे की मौजे आमशी येथील स.क्र.२२/३ चे मिळकत धारकांनी विनापरवाना  उत्खनन केले प्रकरणी स.नं.२०/१ व २२/२ मधील विनापरवाना केलेल्या उत्खननाचा पंचनामाचे दिनांकाच्या तेवीस दिवस अगोदर सादर केले असताना या मिळकतीतील विनापरवाना केलेल्या उत्खननाबाबत दंडात्मक कारवाई करण्याबाबत नियमानुसार प्रथम प्राधान्य देऊन कारवाईचे आदेश करणे आवश्यक असल्याचे सकृतदर्शनी माहिती असताना देखील  मौजे आमशी येथील स.क्र.२२/३ मध्ये प्रचंड प्रमाणात उत्खनन केलेल्या लगतची मिळकत स.क्र.२०/१ व २२/२ या जमिनी मध्ये अनाधिकृतपणे विनापरवाना उत्खनन प्रकरणी  तत्कालीन तहसीलदार सौ सुषमा पाटील यांनी केवळ चार महिन्यांच्या कालावधीत सदर मिळकतीचे मिळकत धारक श्री आनंदकुमार केडीया यांच्यावर विनापरवाना उत्खनन प्रकरणी रक्कम रु. ८५,३५,९१२ इतक्या रक्कमेचा दंडात्मक कारवाई केली आहे.

              तलाठी श्री वनवे यांनी दि.५/१२/२२ रोजी पंचनामा केल्या पासून आठ महिन्यांचा प्रदीर्घ कालावधी होऊन देखील मौजे आमशी येथील सर्व्हे. क्र.२२/३ मध्ये  हजारों ब्रास उत्खनन प्रकरणी मिळकत धारकावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी  तहसीलदार महाबळेश्वर कडून विलंब का लावला गेला आहे.   तहसीलदार महाबळेश्वर कार्यालयीन कामकाजाबाबत याप्रकरणावरुन शंकाकुशंका निर्माण होत असल्याने जिल्हाधिकारी  सातारा यांनी मौजे आमशी तालुका महाबळेश्वर येथील स.नं २२/३ या मिळकतीत पर्यावरणाची प्रचंड हानी करुन हाजारो ब्रास पेक्षा अधिक जास्त प्रमाणात विनापरवाना केलेल्या उत्खनना प्रकरणी मिळकत धारकावर  आठ महिने होऊन सुध्दा दंडात्मक कारवाई करण्यास तहसीलदार महाबळेश्वर कार्यालयाकडून विलंब केला जात असल्या प्रकरणी दोषी आढळणाऱ्या शासकीय कर्मचारी व्यक्तीवर चौकशी कारवाई चे आदेश द्यावेत. तसेच स. नं. २२/३ मध्ये विनापरवाना हजारों ब्रास पेक्षा अधिक प्रमाणात जमिन उत्खनन प्रकरणी मिळकत धारकावर शासकीय नियमानुसार दंडात्मक कारवाई करुन मौजे आमशी येथील स.क्र.२०/१,स.क्र.२२/२,स.क्र.२२/३ या मिळकतीत पर्यावरणाची प्रचंड प्रमाणात हानी करून विनापरवाना हजारों ब्रास पेक्षा अधिक प्रमाणात विनापरवाना उत्खनन केले प्रकरणी नमूद जमिन मिळकतीवर जिह्याधिकारी सातारा यांनी विकास कामांना सक्त मनाई  बंदीचे आदेश देऊन शासकीय स्तरावर लवकर लवकर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी पर्यावरण प्रेमी व सामाजिक कार्यकर्ते श्री सूर्यकांत पांचाळ यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments