Type Here to Get Search Results !

गणरायाच्या कृपेने जर संधी मिळाली तर साखरवाडी गटातुन आपण जिल्हा परिषदेची निवडणूक लढविणार -दिलीप (बाबा) पवार

गणरायाच्या कृपेने जर संधी मिळाली तर साखरवाडी गटातुन आपण जिल्हा परिषदेची निवडणूक लढविणार -दिलीप (बाबा) पवार   

प्रतिनिधी /साखरवाडी 

 साखरवाडीचे नगरीचे समाजसेवक व ग्रामपंचायतचे माजी तंटामुक्ती उपाध्यक्ष माननीय श्री.दिलीप बाबा पवार साहेब यांच्या हस्ते जाणता राजा ग्रुप मंडळ खुंटे  यांच्या वतीने आरती घेण्यात आली.यावेळी त्यांच्या समवेत साखरवाडी ग्रामीणचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक  हांगे साहेब यांना ही आरती करण्याचा मान मिळाला .यावेळी दिलीप बाबा यांनी मंडळाला वेळोवेळी मदतीचे आश्वासन दिले.तसेच त्यांनी येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जर पक्षाने जबाबदारी दिली तर साखरवाडी गटातुन  आपण निवडणूक लढवणार आहोत हे ही स्पष्ट केले.त्यांना खुंटे गावातून निवडणूक लढवण्यासाठी युवा वर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.यावेळी मंडळाचे कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments