गिरिस्थान नगरपरिषद शाळा क्र. ५ महाबळेश्वर येथे "नाना नानी" दिवस मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा.....
महाबळेश्वर (सातारा)
गिरिस्थान नगरपरिषद शाळा क्रमांक महाबळेश्वर येथे सोमवार ४ ऑगस्ट २०२३ रोजी "नाना नानी" दिवस साजरा करण्यात आला. महाबळेश्वर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री पळसे साहेब, केंद्रप्रमुख श्री दिलीप जाधव सर, विषयतज्ञ श्री अहिवळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य देखील उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांचे आजी-आजोबा मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचे पाद्यपूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. तत्पूर्वी महाबळेश्वर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी श्री पळसे साहेब यांनी विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांसोबत हितगुज केले. त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी केंद्रप्रमुख श्री जाधव सर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास शाळा क्र. ५ चे मुख्याध्यापक श्री देशमुख सर व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments