फलटण तालुक्यातील साखरवाडी गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!
प्रतिनिधी /वैभव जगताप
आमच्या पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्हाचा नेहमीच गौरव होत आलेला आहे व त्यातीलच आमचा फलटण तालुका हा नेहमीच अग्रेसर राहीला आहे,कारण आमची भुमी ही संतांची व लढवय्ये महापुरुषांची आणि रणरागिणी महिलांची व संस्कृतीची आहे आणि याचीच अस्मिता राखण्याचे काम आमच्या साखरवाडीतील एका शिवकन्येने केले आहे.
मौजे साखरवाडी ता.फलटण,जि.सातारा.येथील कु. श्रुती बाळकृष्ण भोसले ( साखरवाडी ) हिची MPSC मार्फत कृषी मंडल अधिकारी क्लास 2 या पदावर निवड झाली . त्याबद्दल तिचे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती सन्माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ( महाराज साहेब ) यांच्या शुभहस्ते तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य खोखो असोसिएशन चे अध्यक्ष आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. कु. श्रुती भोसले ही खोखो ची 3 वेळा राष्ट्रीय खेळाडू झालेली आहे. याबद्दल तिचे विशेष कौतुक बाबांनी केले . यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे व व्हाईस चेअरमन श्री. नितीन (दादा )भोसले आणि पोपटराव भोसले तुकाराम पवार अभयसिंह निंबाळकर माऊली गायकवाड व बाळकृष्ण भोसले उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments