रत्नबन प्रतिष्ठान साखरवाडी कडून उद्या भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन
प्रतिनिधी दादा जाधव
साखरवाडीत ता.फलटण येथे शुक्रवार दि.२९.०९.२०२३ रोजी रत्नबन प्रतिष्ठान चे अध्यक्ष विरेंद्र जाधव व उपाध्यक्ष विनोद जाधव यांचे वडील बबनराव परशुराम जाधव यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन भवानी मंदिर बाजारपेठ साखरवाडीत करण्यात आले आहे
या शिबिरामध्ये डोळ्यांशी संबंधित सर्व तपासणी चष्मा नंबर मोतीबिंदू तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे तसेच आवश्यक असेल त्यांना अल्प दरात चष्मे दिले जातील त्याचबरोबर शस्त्रक्रिया ऑपरेशनची गरज असलेल्या व्यक्तींसाठी एच व्ही आय हॉस्पिटल मोहम्मंद वाडी पुणे यांच्या सहकार्याने लेन्स सहित बिगर टाक्यांचे ऑपरेशन मोफत केले जाणार आहे
रत्नबन प्रतिष्ठान व धन्वंतरी जनकल्याण सामाजिक संस्था साखरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हिमोग्लोबिन HB व रक्तगट तपासणी शिबिर याचेही आयोजन केले आहे
तरी दोन्ही शिबिरांचा गरजू व्यक्तींनी लाभ घ्यावा असे आयोजक रत्नबन प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र जाधव,उपाध्यक्ष विनोद जाधव,सचिव हरिदास सावंत व स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटना साखरवाडी यांच्यावतीने कळवण्यात येत आहे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क :वैभव जगताप
८००७८५२१२१

Post a Comment
0 Comments