होळ ता.फलटण येथील मिनाक्षी जाधव व ताराबाई जाधव यांच्या शेतीस इंडोनेशियातील परदेशी पाहुण्यांची भेट
प्रतिनिधी दादा जाधव
होळ ता.फलटण येथे स्मार्ट प्रकल्पातील श्रीमती मीनाक्षी जाधव व श्रीमती ताराबाई जाधव यांच्या
एमपीकेव्ही एग्रीकॉस फार्मर्स प्रोड्युसर कंपनी अंतर्गत बायोफोर्टीफाईड बाजरीच्या पिकास हार्वेस्ट प्लस चे व्यवस्थापक सुलेमान जिनटिंग, इंडोनेशिया यांनी नुकताच भेट देऊन पिकाची पाहणी केली
जोमदार बाजरी चे पिक पाहून मिलेट अड्डा चे संचालक महेश लोंढे यांनी कौतुक केले
सदर शेतकरी उत्पादक कंपन्या अंतर्गत पिकवले जाणारे सर्व उत्पादने मॅकमिलेट या ब्रँडच्या नावाखाली विक्री होणार असल्याचे एफएओ चे सल्लागार श्री राजकुमार गिरी यांनी सांगितले शेतीमध्ये महिलांचा सहभाग पाहून श्री सुलेमान भारावून गेले
तसेच श्रीमती मीनाक्षी जाधव व श्रीमती ताराबाई जाधव यांनी पिकाबाबत आपले अनुभव व्यक्त केले
सदर कार्यक्रमास रामचंद्र जाधव, विराज जाधव,धनंजय जाधव,कविता नलावडे,रूपाली पवार, लता भोसले,संगीता जाधव, रेखा पिसाळ, उपस्थित होते
यावेळी सुखदेव नलवडे यांनी आभार मानले
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क :वैभव जगताप
८००७८५२१२१

Post a Comment
0 Comments