Type Here to Get Search Results !

दि एम्रल्ड हाईट्स प्री स्कूल अँड अकॅडमी साखरवाडीमध्ये ग्रँड पेरेंट्स डे (आजी आजोबा दिवस)व सत्यनारायण महापूजा उत्साहात साजरा करण्यात आली.

 दि एम्रल्ड हाईट्स प्री स्कूल अँड अकॅडमी साखरवाडीमध्ये ग्रँड पेरेंट्स डे (आजी आजोबा दिवस)व सत्यनारायण महापूजा    उत्साहात साजरा करण्यात आली.


फलटण/वैभव जगताप 

फलटण तालुक्यातील दि एम्रल्ड हाईट्स प्री स्कूल अँड अकॅडमी साखरवाडीमध्ये बुधवार दिनांक 27/09/2023   रोजी  ग्रँड पेरेंट्स डे(आजी आजोबा दिवस)आणि सत्यनारायण महापूजा उत्साहात साजरा करण्यात आली . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली दत्तात्रय शिंदे मॅडम उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी सर्व  विद्यार्थी स्कूल युनिफॉर्म मध्ये तयार होऊन आले होते. तसेच विद्यार्थ्यांचे आजी बाबा हे उपस्थित होते .सर्वप्रथम प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते गणपती पूजन व सर्व आजी-आजोबांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालकांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली. त्यानंतर गणपती आरती करण्यात आली. तसेच ग्रँड पेरेंट्स डे निमित्त आजी आजोबांचे पाय पूजन व वेगवेगळ्या खेळ घेण्यात आले. त्यानंतर खेळात विजेते झालेल्या आजी-आजोबांना गिफ्ट देण्यात आले. तसेच ग्रँड पेरेंट्स डे व सत्यनारायण महापूजा निमित्त महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले होते .सर्व कार्यक्रम झाल्यावरती सर्वांनी महाप्रसादाचा आनंद घेतला.अशाप्रकारे ग्रँड पेरेंट्स डे व सत्यनारायण महापूजा हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास  शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली दत्तात्रय शिंदे मॅडम, स्कूल इन्चार्ज शितल कुंभार मॅडम, मोनाली कुलकर्णी, शिवगंगा पवार, वर्षा खोमणे, पल्लवी भापकर,शिरीन मुलाणी, मोनाली जाधव, अश्विनी गायकवाड ,सुषमा गायकवाड सर्व विद्यार्थी वर्ग, शिक्षकवृंद , पालक वर्ग उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क :वैभव जगताप 

८००७८५२१२१

Post a Comment

0 Comments