Type Here to Get Search Results !

फलटण पोलिस विभाग निर्भया पथकाचा साखरवाडी विद्यालयात उद्बोधन कार्यक्रम संपन्न..!

 फलटण पोलिस विभाग निर्भया पथकाचा साखरवाडी विद्यालयात उद्बोधन कार्यक्रम संपन्न..!


फलटण/वैभव जगताप 


सातारा पोलिस अंतर्गत फलटण पोलिस विभागाच्या निर्भया पथकाने साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


सातारा जिल्हा पोलिस प्रमुख माननीय श्री समीर शेख साहेब ,  फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी माननीय श्री राहुल धस साहेब , फलटण ग्रामीण चे पोलिस निरीक्षक माननीय श्री सुनील महाडिक साहेब या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली साखरवाडी पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक माननीय श्री मोहन हांगे साहेब , महिला हेड कॉन्स्टेबल माननीय श्री वैभवी भोसले मॅडम यांनी विद्यार्थ्याना उद्बोधन केले.श्री हांगे साहेबांनी विद्यार्थ्याना कायद्याचे महत्त्व पटवून देवून सर्व प्रकारच्या अपप्रवृत्त्ती पासून दूर राहण्याचे आवाहन केले.सौ भोसले मॅडम यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने मुलींना निर्भय राहण्याचे आवाहन करून पोलिस दल सदैव पाठीशी आहे असा विश्वास दिला.कोणीही कसलाही त्रास दिला की लगेचच पोलिस दलाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधलाअसता पोलिस तुमच्या दाराशी येवून तुम्हाला न्याय तर देतीलच , पण गुन्हेगाराला कडक शासन देण्यासाठी सतत प्रयत्न करत राहतील हे त्यांनी आवर्जून सांगितले.याबरोबरच मोबाईल चा अतीवापर,अयोग्य वापर यांचे दुष्परिणाम नमूद केले.याप्रसंगी साखरवाडी गावच्या पोलिस पाटील माननीय सौ सोनाली ताई पवार , साखरवाडी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिलाताई जगदाळे , कॉन्स्टेबल सौ राणी कुदळे , कॉन्स्टेबल श्री दत्तात्रय भिसे , विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री सचिन पवार , विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी , सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


सौ जगदाळे मॅडम यांनीही विद्यार्थ्याना उद्बोधन केले.प्रास्ताविक विद्यालयातील सहाय्यक शिक्षक श्री हरिदास सावंत यांनी तर आभार ज्येष्ठ शिक्षक श्री विलास जाधव सरांनी व्यक्त केले.मुख्याध्यापिका सौ जगदाळे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली विद्यालयातील सखी सावित्री मंच प्रमुख सौ मनीषा गायकवाड व सांस्कृतिक समिती प्रमुख श्री सावंत सर यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन केले.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 

मुख्य संपादक :वैभव जगताप -८००७८५२१२१




.

Post a Comment

0 Comments