शिक्षक दिनानिमित्त साखरवाडी गावचे लोकप्रिय माजी सरपंच व विद्यमान सदस्य विक्रमसिंह भोसले यांच्या हस्ते साखरवाडीतील शिक्षकांचा सत्कार समारंभ संपन्न
प्रतिनिधी दादा जाधव
शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज ५ सप्टेंबर रोजी शिक्षक म्हणजे अंधारात हरवलेल्या प्रकाशात आणणारा शिक्षक, वाळवंटामध्ये हरवलेल्या व्यक्तीला रस्ता दाखवणारा गुरू व या गुरू रुपी शिक्षकांचे सत्कार समारंभ साखरवाडी गावचे लोकप्रिय माजी सरपंच व विद्यमान सदस्य विक्रमसिंह भोसले यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला
साखरवाडी विद्यालय साखरवाडी येथे प्रमुख कार्यक्रमात साखरवाडी विद्यालयाच्या मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षिका यांचा सत्कार करण्यात आला व त्यानंतर सरदार वल्लभभाई हायस्कूलचे माजी शिक्षक तसेच साखरवाडीतील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला
या सत्कार समारंभ प्रसंगी साखरवाडी चे लोकप्रिय माजी सरपंच व विद्यमान सदस्य विक्रम सिंह भोसले तसेच साखरवाडीचे उपसरपंच अक्षय रुपनवर, डॉ.आनंदा जाधव, विकी भोसले, संग्राम औचरे, बंटी भैया शेख व कार्यकर्ते उपस्थित होते





Post a Comment
0 Comments