फलटणला चक्काजाम आंदोलन यशस्वी!
फलटण प्रतिनिधी
जालना येथील सराटी गावातील मराठा समाज आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकावर पोलिसांनी शुक्रवारी केलेल्या हल्ल्याच्या( लाठी मारा च्या) निषेधार्थ महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटले आहेत. सोमवार दि. ४ रोजी फलटण मध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी शेकडो मराठा बांधवांनी चक्काजाम आंदोलनामध्ये सहभाग घेत मराठा आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे; "छत्रपती शिवाजी महाराज की जय" " अरे कोण म्हणत देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही; एक मराठा आम्ही लाख मराठा, जय शिवाजी जय जिजाऊ, जय भवानी जय शिवाजी, धर्मवीर संभाजी महाराज की जय, अशा विविध घोषणा देत सर्वच पक्षांच्या राज्यकर्त्यांचा यावेळी निषेध करण्यात आला चक्काजाम आंदोलन झाल्यानंतर फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
महाड पंढरपूर महामार्गावरील फलटण मधील नाना पाटील चौक येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे विविध मान्यवर व शिव कडू बांधव उपस्थित होते फलटण व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, भाजी मंडई, व दुकानदारांनी प्रतिसाद देण्याचे आव्हान केले होते. एसटी महामंडळामार्फत बस सेवा थांबवण्यात आली होती. तालुक्यातील विविध शाळा ज्युनियर कॉलेज, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती आंदोलन स्थळी पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन तैनात करण्यात आले होते.
यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली त्यावेळी फलटण हे छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ असणारी भूमी आहे आज पर्यंत विविध राज्यकर्त्यांना आपण निवडून दिले आहे तरीपण कोणीही मराठा आरक्षण आपल्याला देऊ शकले नाही जर राज्यामध्ये विचार केला तर सुमारे 70 टक्के आमदार खासदारही मराठा आहेत परंतु लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रातील मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरती गेले सात वर्षे लोकशाहीच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने मोर्चे काढून त्या ठिकाणी आपली लढाई लढत आहोत परंतु मराठा समाजा मताधिक्यावर वारंवार पुढच्या मिळवल्या व समाजातील आरक्षणाचा विसर सर्व पक्षांना पडला आहे परंतु राजकीय प्रतिनिधींनी जागे व्हावे मराठा समाजाला आरक्षण जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आरक्षणाची लढाई शांततेच्या मार्गाने चालूच राहील गेले सात वर्ष अतिशय शांतते च्या मार्गाने वारंवार आंदोलने करण्यात आले. सरकार पुढे आरक्षणासाठी मागणी केले सर्वांनी एकत्र येऊन मान्य केली नाही तर आज नाहीतर कधीही नाही अशा प्रकारे मराठा समाजाला खच्ची करण्याचा प्रयत्न केला जात आहे यापुढे कोणताही राजकीय पक्ष म्हणून नाही तर मराठा म्हणून आपण एकत्र आले पाहिजे यापुढे कोणत्याही ठिकाणाहून आपल्याला कोण त्याही मराठा बांधवांनी हाक दिली तर मराठा रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही या राज्यकर्त्यांनी मराठा समाजाचा अंत पाहू नये असे सुद्धा यावेळी मत व्यक्त केले.


Post a Comment
0 Comments